31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...
HomeRatnagiriभाजपचे महासचिव विनोद तावडे उद्या रत्नागिरीत, महायुतीचे उमेदवार राणेंचा प्रचार जोरात

भाजपचे महासचिव विनोद तावडे उद्या रत्नागिरीत, महायुतीचे उमेदवार राणेंचा प्रचार जोरात

रत्नागिरीतील प्रतिष्ठित लोकांशी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तळ ठोकला असून, मित्रपक्ष शिवसेना नेते किरण सामंत यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचाराची रणनिती आखली जात आहे. २४ एप्रिलला भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे रत्नागिरीत येऊन स्वतः रत्नागिरीतील प्रतिष्ठित लोकांशी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरुन शिवसेना व भाजपातील रस्सीखेचनंतर भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.

त्यानंतर शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन गेले काही दिवस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मतदारांची मोट बांधत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर खाडीपट्टा आणि साखरपा, लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे. सामंत प्रचारात सक्रिय शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर स्वतः किरण सामंत यांना सोबत घेऊन रविंद्र चव्हाण यांनी प्रचार यंत्रणेला वेग दिला आहे.

शिवसेनेचे पदाधिकारीही प्रचाराच्या कामात फिरु लागले आहेत. स्वतः किरण सामंत यांनी चिपळूण, लांजा व राजापूरमध्ये फिरुन प्रचाराला सुरुवात केली आहे. ना. चव्हाण यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरु असून, कोणत्या भागात विशेष लक्ष दिले पाहिजे यावरही चर्चा होत आहे. भाजपाचे लोकसभा सहप्रभारी माजी आमदार बाळ माने, दक्षिण – रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष, ‘आजीमाजी पदाधिकारी यांच्या माध्यमातून भाजपाने कमळ निशाणी घराघरात पोहचवण्याच्या प्रयत्नाला वेग दिला आहे.

विनोद तावडे उद्या रत्नागिरीत भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत येत असून सकाळी ९.३० वा. रत्नागिरीतील प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ११ वा. महायुतीच्या कार्यकर्त्यांची स्वयंवर मंगल कार्यालयात बैठक घेणार आहेत. भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे २५ एप्रिल रोजी सकाळी पावस येथे तर संध्याकाळी ६ वा. खंडाळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. होणाऱ्या मतदानापेक्षा ७० टक्के मतदान महायुतीला कसे होईल याचे नियोजन ना. चव्हाण यांनी सुरु केले आहे.

महायुतीचे उमेदवार राणे यांच्या पत्नी प्रचारासाठी मैदानात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ. निलमताई राणे या २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत येऊन विविध भागातील महिलांशी संवाद साधणार आहेत. सकाळच्या सत्रात कासावेली, शिरगाव, भाटीमिऱ्या, मुरुगवाडा तर दुपारी ४नंतर कुवारबाव, नाचणे, छत्रपतीनगर, तेलीआळी, किल्ला या भागात महिलांशी संवाद साधणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular