रत्नागिरी रेल्वेस्टेशनचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचेही रूपडे पालटले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटत आहे. चिपळूण येथेही सुशोभीकरण सुरू आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांसह दुचाकी, मोटारचालक, रिक्षाचालकही हैराण झाले होते; मात्र या सुशोभीकरणाची सुरुवात या रस्त्यापासून झाली आहे..
धक्के खात स्थानकाकडे जाणारे प्रवासी आता सुखावले आहेत. सध्या रेल्वेस्टेशनच्या दर्शनी भागाचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवण्यात आले असून, काम वेगाने सुरू आहे. अत्याधुनिक सुविधानीयुक्त रेल्वेस्टेशन लवकरच प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.