27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeMaharashtraयशवंत जाधवांच्या मिस्ट्री डायरीमध्ये अजून दडलं तरी आहे काय!

यशवंत जाधवांच्या मिस्ट्री डायरीमध्ये अजून दडलं तरी आहे काय!

यशवंत जाधव यांच्या डायरीत "मातोश्री" व्यतिरिक्त आणखी दोन नावांचे संदर्भ आढळले आहेत. ते म्हणजे केबल मॅन आणि एम ताई.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मिस्ट्री डायरीमध्ये असलेल्या अनेक गोष्टी हळू हळू बाहेर पडू लागल्या आहेत. आधी त्यांच्या डायरी मध्ये मातोश्री चा असलेल्या उल्लेखाने सर्व पक्षांमध्ये उलथापालथ झाली होती. परंतु त्याबद्दल जाधव यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे वातावरण काहीशा प्रमाणात निवळलेले.

परंतु आता त्यांच्या डायरीमधून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत “मातोश्री” व्यतिरिक्त आणखी दोन नावांचे संदर्भ आढळले आहेत. ते म्हणजे “केबल मॅन” आणि एम ताई. या दोघांनाही प्रत्येकी २५ आणि ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख यशवंत जाधव यांचा डायरीत आहे, अशी माहिती दिली जात आहे. या डायरीतील नोंदीचा आयकर विभाग शोध घेत आहे.

यशवंत जाधव यांनी मातोश्रीला अडीच लाख रुपयांचे घड्याळ दिले असल्याचे आणि ५० लाख रुपये दिले असा उल्लेख आधीच आढळला होता. त्यावरून मातोश्री म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडिलार्जित निवासस्थान मातोश्री असा राजकीय अर्थ अनेक विरोधी पक्षांनी काढला होता. मात्र, मातोश्री असा उल्लेख आपण स्वत:च्या आईचा केला असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी केला होता. यावर आयकर विभागाने विश्वास ठेवलेला नाही.

मात्र आता त्या पलिकडे जाऊन “केबल मॅन” आणि “एम ताई” या दोघांना प्रत्येकी २५  आणि ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख यशवंत जाधव यांच्या डायरीत असल्याचे आढळल्याने  केबल मॅन म्हणजे नेमके कोण आणि एम ताई कोण?, याविषयीचा तर्क वितर्क सुरू आहेत. परंतु “केबल मॅन” हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत तर एम ताई या मुंबई महापालिकेत होत्या असा सुर राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular