24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurदिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन तात्काळ कारवाईचे आदेश – आम. साळवी

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन तात्काळ कारवाईचे आदेश – आम. साळवी

अनेक वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने, ओणी-अणुस्कुरा रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले होते.

राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा हा रस्ता ३६ किमीचा आहे. गेल्या पावसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण कोल्हापूर जोडणारा आंबा घाट खचला होता, दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या पर्यायी मार्गाने ओणी अणुस्कुरा या मार्गावरून जात होत्या. परंतु, अनेक वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने, ओणी-अणुस्कुरा रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले होते. नुकतेच हे काम मार्गी लागावे यासाठी १ मे रोजी जनतेने आंदोलन केले होते.

परंतु, पावसाळा जवळ आला तरीही कोकणातील ओणी-अणूस्कुरा मार्गाची परिस्थिती ‘जैसे थेच’ आहे. निधी मंजूर झाला असूनही या मार्गाच्या कामाला अद्याप सुरूवात करण्यात आलेली नाही. हा सगळा प्रकार मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट कार्यालयात जाऊन अशा कामाबद्दल संताप व्यक्त करत या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे विद्यमान ज्येष्ठ आमदार राजन साळवी आहेत. यासाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी सार्वजनिक विभागाच्या सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. निधी मिळून देखील कामालाच अजून सुरुवात न केल्याने, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी निवेदन दिल्याने हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोकणात ओणी अणूस्कुरा मार्गासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला. अंदाजपत्रक निविदा सगळया तांत्रिक प्रक्रिया पार पडल्या. पण, अद्याप कामाला सुरुवातच नाही. तब्बल ५ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा निघाली,  टेंडर भरले. मात्र, संबंधित ठेकेदाराला चुकीच्या धोरणामुळे काम देऊन अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने कोकणातून कोल्हापूर मार्गे जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामाला सुरुवातच झालेली नाही,  असा थेट आरोप आमदार राजन साळवी यांनी केला आहे.

या प्रकरणी तात्काळ चौकशी होऊन यामध्ये संबधित असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. तसेच, पावसाळयापूर्वी ओणी-अणूस्कुरा रस्त्याची दुरुस्ती होणेच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही व्हावी आशा सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular