31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...
HomeRajapurदरवर्षीचे पुराचे संकट दूर होईल, यासाठी राजापूरकरांचा उस्फूर्त लोकसहभाग

दरवर्षीचे पुराचे संकट दूर होईल, यासाठी राजापूरकरांचा उस्फूर्त लोकसहभाग

नगर पालिका, महसूल प्रशासनाच्या सहभागातून व नाम फाउंडेशनचा पुढाकार आणि लोकसहभागातून हा गाळ उपसा केला जाणार आहे.

राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी लोकसहभागाच्या आवाहनाला राजापूरकरांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा केला जात आहे. नगर पालिका, महसूल प्रशासनाच्या सहभागातून व नाम फाउंडेशनचा पुढाकार आणि लोकसहभागातून हा गाळ उपसा केला जाणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी लागणार्‍या इंधनाचा खर्च लोक सहभागातून उचलायचा असे एकमताने ठरले. त्यासाठी प्रशासनाकडून राजापूरकरांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरवर्षीचे पुराचे संकट दूर होईल यासाठी लोकांकडून देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

अनेक शासकीय विभागाकडून काही लाखांमध्ये रक्कम जमा झाली असून मदतीचा ओघ अजून सुरूच आहे. राजापूर तालुका व्यापारी संघाने पहिल्या टप्प्यामध्ये १ लाख २१ हजार रुपयांची तर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी ५५ हजार ५५५ रुपयांची, महापुरूष सेवा संघ वरचीपेठ यांनी २५ हजाराची मदत केली आहे. व्यापारी संघासह अ‍ॅड. खलिफे आणि अन्य दात्यांनी मदतीच्या रक्कमेचे धनादेश प्रांताधिकारी वैशाली माने यांच्याकडे सुपूर्द केले.

यापूर्वी राजापूर तालुका डॉक्टर असोशिएशनने १ लाख रुपयांची मदत केली आहे. अविनाश जाधव १० हजार, मानसी जाधव ५ हजार, जयवंत जाधव यांनी ५ हजार, मिलिंद पोतनीस यांनी ११ हजाराची वैयक्तिक  मदत देखील केली आहे.

गाळ उपशाच्या कामासाठी दिलेल्या मदतीच्या रक्कमेचे धनादेश प्रांताधिकारी माने यांच्याकडे दात्यांनी सुपूर्द केले. या वेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी सुहास पंडित आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या व्यतिरिक्त गाळ उपशासाठी अनेक सामाजिक संस्थांसह अनेकांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular