22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे, अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे, अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

जयंत पाटील यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दीड तास कामकाज रोखून धरले होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी घोषित केल्यानंतर बोलण्यास उभे राहिलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलण्यास अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत असला निर्लज्जपणा करू नका, असे सुनावल्याने जयंत पाटील यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दीड तास कामकाज रोखून धरले होते. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.

ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरीत काळापर्यंत हे निलंबन राहील. या कालावधीत पाटील यांना मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात प्रतिबंध करण्यात आला आहे. गेल्या सलग ३२ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्यावर झालेली ही बहुदा पहिलीच कारवाई आहे. या साऱ्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फोन करुन सभागृहात नेमका काय प्रकार घडला, याची माहिती घेतली.

दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी जाहीर केली. त्यामुळे विरोधकही आक्रमक झाले. त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली. शिवसेना सदस्य भास्कर जाधव हे तावातवाने बोलण्याची परवानगी मागत होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी विरोधकांना अध्यक्ष बोलू देत नाहीत, असे सांगत तुम्ही असला निर्लज्जपणा करू नका, असे त्यांनी अध्यक्षांना सुनावले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. त्यांनी जयंत पाटील यांना आताच्या आता निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावेळी उडालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा दीड तासासाठी तहकूब करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular