26.6 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीतील डॉक्टरांची लाखांची फसवणूक, ऑनलाईन पेमेंट फसवणूक

रत्नागिरीतील डॉक्टरांची लाखांची फसवणूक, ऑनलाईन पेमेंट फसवणूक

दुकानातील २ महिला कर्मचार्यांनी पेटशॉप व्यवहाराची रक्कम विना परवानगीने आपल्या गुगल पे अकाउंटवर स्वीकारून डॉक्टरची सुमारे ४ लाख १२  हजार १७२ रुपयांची फसवणूक केली.

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राण्यांचे डॉक्टर डॉ.अविनाश भागवत यांची लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्याच दुकानातील २ महिला कर्मचार्यांनी पेटशॉप व्यवहाराची रक्कम विना परवानगीने आपल्या गुगल पे अकाउंटवर स्वीकारून डॉक्टरची सुमारे ४ लाख १२  हजार १७२ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दुकानातील दोन महिला कर्मचार्‍यांना शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल २०२१ ते ३० मार्च २०२२ या कालावधीमध्ये घडला. ज्या दोन महिला कर्मचार्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे त्यांची नावे रेणुका गिजे वय २६, रा.के. सी. जैन नगर, रत्नागिरी आणि दिशा सुर्वे वय २८,  रा.शांतीनगर, रत्नागिरी अशी आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. अविनाश पांडुरंग भागवत वय ४८, रा.टिळक आळी रत्नागिरी यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली.

डॉ. भागवत यांचे साळवी स्टॉप येथे पेट्स गॅलरी नावाचे नवीन दुकान उघडले आहे. त्यामध्ये रेणुका आणि दिशा कामाला होत्या. त्यांनी डॉक्टर भागवत यांची परवानगी न घेताच आपापल्या गुगल पे अकाउंटवर शॉपच्या व्यवहाराची रक्कम त्यांनी स्वीकारली. आणि डॉक्टरांना याबद्दल काहीच कल्पना देखील दिली नाही. रेणुका गिजेने २ लाख ७ हजार ९३ रुपये तर दिशा सुर्वेने २ लाख १ हजार २७९ रुपयांचा गैरव्यवहार केला. तसेच ३० मार्च रोजी सकाळी त्यांनी दुकानाच्या काउंटरमधील रोख ३ हजार ८०० रुपयेही चोरून एकूण ४ लाख १२ हजार १७२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular