32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...
HomeRatnagiriरत्नागिरीतील विद्यार्थ्यांची एप्रिल किंवा मे महिन्यात होणार नासा स्वारी

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांची एप्रिल किंवा मे महिन्यात होणार नासा स्वारी

जिल्हास्तरासाठी निवडलेल्या ९० विद्यार्थ्यांतून २७ जणांची निवड करण्यात आली.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्यात येणार आहे. यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी ९० विद्यार्थी पात्र ठरले होते. या सर्वांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. जिल्हास्तरासाठी निवडलेल्या ९० विद्यार्थ्यांतून २७ जणांची निवड करण्यात आली. यासाठी विज्ञानातील तज्ज्ञ १५ अध्यापकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला नासाला, तर प्रथम तीन क्रमांकांना इस्रो असे एकूण २७ जणांची निवड करण्यात आली आहे. नासा दौरा एप्रिल किंवा मे महिन्यात होईल, अशी अपेक्षा आहे.

मंडणगड-प्रभुती घागरूम (कोन्हवली), श्लोक सुगदरे (मंडणगड), जान्हवी खापरे (शेडवई), दापोली- धनश्री जाधव (शिरसोली), तनिष्का बोधगावकर (जालगाव), सुयश गोसावी (मळे), खेड-कीर्ती मुंडे (असगणी), सार्थक महाडिक (धामणदिवी-बेलवाडी), वेदांत मोरे (देवघर-निवाचीवाडी), चिपळूण-दक्ष गिजये (पाग), अभय भुवड (तुरंबव), इच्छा कदम (अनारी), गुहागर-सोनाली डिंगणकर (काजुर्ली), क्षितिजा मोरे (वेळंब), मुशतहा शेख (कोंडशृंगारी), संगमेश्वर-निरज इनामदार (तुरळ), आरोही सावंत (ओझरखोल), नितीन बोडेकर (चाफवली), रत्नागिरी-वेदांत सनये (कुवारबाव), प्रेरणा भोजने (गोळप), साथिया संते (गोळप), लांजा-आशिष गोबरे (शिरवली), आर्यन गुरव (वनगुळे), वेदिता वारंगे (लांजा), राजापूर-विनया जाधव (भालावली), भूषण धावडे (पांगरे बु.), प्राजक्ता भोकरे (तुळसवडे) यांची निवड झाली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे, संदेश कडव यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले.

RELATED ARTICLES

Most Popular