28.1 C
Ratnagiri
Friday, June 2, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeIndiaपुन्हा मास्क सक्तीची शक्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मोठं विधान

पुन्हा मास्क सक्तीची शक्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मोठं विधान

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मास्क लावणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण जगाने कोरोनाच्या तीन जीवघेण्या लाटा अनुभवल्या आहेत. पहिल्या लाटेत वेगाने होणारा संसर्ग, दुसऱ्या लाटेत होणारे मृत्यू हे देश विसरलेला नाही. तसंच लॉकडाऊनच्याही अनेक कटू आठवणी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत. अशामध्ये कोरोना केसेस पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. जे प्रचंड व्हायरल झाले असून खूप चर्चेत आहे.

चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढतो आहे. त्यामुळे भारतानेही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मास्क लावणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर सर्वांनी सतर्क राहावं अशाही सूचना दिल्या आहेत.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. चीननंतर इतर देशांसह भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केलं आहे. राज्यात पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्या आहेत. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर देशातून आलेल्यांची विमानतळावर टेस्टिंग करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तर फक्त चीनमधूनच नाही तर आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची विमानतळावर थर्मल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आलेत. आपल्या देशातून कोणी परदेशात गेलं आणि परदेशातून आल्यावरही त्यांची टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही सावंत यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular