रत्नागिरी येथे राहणारा एका तरुणाशी सोशल मिडीयावरून अज्ञात महिलेने ओळख वाढवली नंतर ते व्हिडीओ कॉलवर बोलू लागले. तरुणाला नंतर एक व्हिडिओ कॉल आला आणि ज्यावेळी हा कॉल उचलला त्यावेळी समोर एक महिला बोलत होती. एका अज्ञात महिलेनं व्हिडीओ कॉल करून तरुणासही ओळख वाढवून त्याचा विश्वास मिळवून कॉल सुरु असतानांच स्वत: नग्न झाली आणि त्याला सुद्धा व्हायला सांगितले.
त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून पीडित तरुणाकडून ५० हजार ५०० रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. संबधित घटनेनंतर या तरुणाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात संबधित तक्रार दाखल केली आहे. संबधित महिलेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ऑनलाईन फसवणुकीचे होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ऑनलाईन फसवणूक संबधीचे प्रकार रोज समोर येत आहेत. ऑनलाईन माध्यमाद्वारे ओळख झालेल्या तरुणीची नग्नावस्थेतील छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये देखील अशा प्रकारच्या घटनेचे दोन नाहक बळी गेले आहेत. दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरीमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी येथे राहणारा एका तरुणाशी महिलेने ओळख वाढवली नंतर दोघांमध्ये व्हिडिओ कॉल सुरु झाले आणि ज्यावेळी हा कॉल उचलला त्यावेळी समोर एक महिला बोलत होती. त्यानंतर व्हिडीओ कॉलवरती बोलणारी महिला नग्न झाली. त्यानंतर तिने तरुणालाही देखील निर्वस्त्र होण्यास सांगितले. भूलथापांना बळी पडलेला या व्हिडीओ कॉल दरम्यान तरुणाचा नग्न व्हिडिओ महिलेने रेकॉर्ड केला.
या घटनेनंतर महिलेने तरुणाला धमकी देण्यास सुरवात केली. तुझा नग्न व्हिडीओ माझ्याकडे आहे. त्या व्हिडीओ बदल्यात मला पैसे दे. नाहीतर तुझा हा व्हिडीओ व्हायरल करते.”, अशी धमकी महिलेने दिली. बदनामीच्या भीतीपोटी तरुणाने या महिलेला ५० हजार ५०० रुपये दिले. नंतर आणखी पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे या तरुणाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.