28.2 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriभागोजीशेठ कीर यांची अवहेलना केलीत, तर आम्ही खपवून घेणार नाही

भागोजीशेठ कीर यांची अवहेलना केलीत, तर आम्ही खपवून घेणार नाही

वाघ यांनी ट्विटरवर छायाचित्रे प्रसिद्ध करत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पुजा केली असे ट्विट केले.

नोव्हेंबर महिन्यामध्ये रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पतितपावन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पतितपावन मंदिराच्या इतिहासाबाबत जे उद्गार काढले त्याबद्दल रत्नागिरी भंडारी समाज आक्रमक झाला आहे. भैरव मंगल कार्यालयात आयोजित जाहिर निषेध सभेत चित्रा वाघ यांचा भंडारी समाजाने निषेध केला आहे.

वाघ यांनी ट्विटरवर छायाचित्रे प्रसिद्ध करत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पुजा केली असे ट्विट केले. या ट्विटनंतर भंडारी समाज संतापला. त्याचे पडसाद आजच्या जाहिर निषेध सभेत उमटले. त्यावेळी भागोजीशेठ कीर यांची अवहेलना केलीत तर आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात ठणकावून सांगताना चित्रा वाघ यांनी माफी मागितलीच पाहिजे अशी जोरदार मागणी भंडारी समाजाने केली.

चित्र वाघ एका पक्षाच्या पदावर असून देखील यांना इतिहासाबद्दल एवढे अज्ञान असल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक रत्नागिरीच्या नागरिकांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला. रत्नागिरीला ऐतिहासिक वारसा लाभला असून, त्याबद्दलचे ज्ञान सर्वच मनुष्य गणांना माहिती असणे गरजेचे आहे. आणि जर पूर्ण माहिती नसेल तर त्याबद्ल सर्वांसमोर चुकीच वक्तव्य करण्यात येऊ नये.

चित्रा वाघ यांचा जाहिर निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, कुमार शेट्ये, रमेश कीर, अखिल भारतीय ओबीसी मंडळाचे अध्यक्ष राज राजापूरकर, तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, डॉ.मकरंद पिलणकर, नितीन मिरकर, माजी अध्यक्ष राजीव कीर,  निलेश नार्वेकर आणि भागोजीशेठ कीर यांची नात अरूणा शिरधनकर उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular