31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...
HomeEntertainmentसंभ्रम वेबसीरिजचे सावंतवाडीत चित्रीकरण सुरु

संभ्रम वेबसीरिजचे सावंतवाडीत चित्रीकरण सुरु

‘लव्ह स्टोरी’ आणि ‘हत्याकांड’ अशा थरारक प्रसंगांचा मिलाप असलेली ‘संभ्रम’ ही वेबसीरिज सावंतवाडीत चित्रीत केली जात आहे.

मागील अनेक वर्षापासून नैसर्गिक भरभरून देणगी लाभलेल्या कोकणामध्ये अनेक मराठी, हिंदी इतर भाषिक चित्रपटांचे शुटींग होत आहे. सध्या दापोली, गुहागर यांसारख्या समुद्रकिनारी देखील विविध नाट्य, चित्रपट कलाकार कामाचे शुटींग पूर्ण करताना दिसत आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये गाव कोकण पट्टा दाखवत असल्याने, अनेक मालिकांमधील लाडके कलाकार देखील कोकणात दाखल होत आहेत.

कोकणात राहणाऱ्या एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या असामान्य गोष्टीमुळे त्याच्या आयुष्यातील प्रेम, भावा-बहिणीचे नाते, त्याची मैत्री या सर्व गोष्टींमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो. ‘संभ्रम’ ही रहस्यमय कथा असून प्रेक्षकांच्या मनात भ्रम निर्माण करणारी आहे. कोकणातील संस्कृती, रितीभाती आणि परंपरा याची माहिती देण्याबरोबरच ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘हत्याकांड’ अशा थरारक प्रसंगांचा मिलाप असलेली ‘संभ्रम’ ही वेबसीरिज सावंतवाडीत चित्रीत केली जात आहे. यामध्ये एक प्रेमगीतही असून या सीरिजमध्ये मुख्य कलाकार सुहास रुके, गायत्री शिंदे, मधुरा पारदुले, राम पवार, राम निपाणीकर, तन्वी वेंगुर्लेकर, कुणाल वारुडे, आकाश शिंदे, कस्तुरी कोळी, तानाजी, राम साबळे, संकेत गोसावी, पूजा खरात, रावते या सर्वांनी भूमिका साकारल्या आहेत.

लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती गोसावी यांनी दिली. या वेबसीरिजच्या टीमने आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. साळगावकर यांनी टीमचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यापूर्वी या टीमने ‘सांग ना रे मना’ हे गीत या ठिकाणी चित्रीत केले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर कोकणातील संस्कृती व परपंरा दाखविण्यासह प्रेम आणि हत्याकांडाची पार्श्वभूमी या मालिकेतून रसिकांना दाखविण्यात येणार आहे, असे या मालिकेचे निर्माता आणि कारीवडे गावचे सुपुत्र सागर गोसावी यांनी सांगितले

RELATED ARTICLES

Most Popular