26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriमहिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जिथे जगभरातील घडलेल्या गोष्टी एका क्षणामध्ये व्हायरल होतात. काही जण बातमीची खात्री न करता तशीच बातमी इतरांना पाठवतात, त्यामुळे एखादी चुकीची बातमी व्हायरल होऊन त्याचे रुपांतर अफवांमध्ये होते. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी महिला रुग्णालयाबाबत काही गैरवर्तनाच्या पोस्ट व्हायरल झाली होती. सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट या पूर्णत: चुकीच्या असून, आमच्यावर गैर आरोप केले जात आहेत, असा दावा करत काल रात्री महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला काम बंद करण्याचा इशारा दिला. याची खबर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना मिळताच ते महिला रुग्णालयात दाखल झाले.

रुग्णालयातील कर्मचार्यांनी नाम. उदय समंत यांच्यासमोर अनेक अडचणी मांडल्या, ज्यामध्ये रुग्णालय आणि परिसरामध्ये रुग्णांकडून घाण केली जाते, बाटलीमध्ये मूत्र विसर्जित करून टाकण्यात येते,  बेसिनमध्ये उरलेले अन्न टाकण्यात येते, सर्वत्र थुंकून ठेवण्यात येते, रुग्णांकडून अंगावर ओरडण्यात येते अशा प्रकारच्या समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागते, असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाम. उदय सामंत यांना सांगितले. रुग्णालयाची दिवसातून तीनवेळा साफसफाई केली जाते मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून मुद्दामहून तिथे अस्वछता पसरवण्यात येते असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाचा एवढा धोका माहित असून सुद्धा स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर, पाणीसुद्धा ओतण्याची तसदी देखील काही रुग्ण घेत नाहीत. आणि मग सोशल मिडीयावर असे अस्वच्छतेचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. एवढ सर्व करून सुद्धा यामध्ये आम्हालाच दोष दिला जात आहे, मग आम्ही काय करावे? असा प्रश्न या कर्मचाऱ्यानी उपस्थित केला आहे.

गेल्या वर्षपासून आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन प्रचंड तणावाखाली दिवसरात्र काम करत आहेत आणि आमच्याच व्यवस्थेची बदनामी करण्यात येते आहे, हे चुकीचे असल्याचे या आरोग्य कर्मचाऱयांनी म्हटले आहे. महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेउन नाम. उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढत सांगितले कि, सध्या तुमचे कार्य हे देवासारखे आहे, जर तुम्ही काम बंद केले तर सगळेच संपले. काही विकृत प्रकारची लोक असतात, पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. आपण सहन करताय, अजून काही दिवस सहन करा. तुम्ही सर्व प्रामाणिकपणे करताय ना बास, यापुढे असेच काम चालू ठेवत रत्नागिरीतील कोरोना संक्रमितांचा मृत्यूचा दर कमी करून रत्नागिरी महिला रुग्णालय हे महाराष्ट्रातील अव्वल रुग्णालय म्हणून कसे गणले जाईल याकडे लक्ष द्या. असे आवाहन नाम. उदय सामंत यांनी या कर्मचाऱ्यांना केले.

RELATED ARTICLES

Most Popular