रत्नागिरी येथील एका मच्छीमारी ट्रॉलरवर मत्स्य विभागाच्या गस्तीपथकाने कारवाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग समोरील समुद्रात ”शीतल” गस्ती नौकेच्या साहाय्याने या नौकेला पकडण्यात आले. सात तांडेलसह हि नौका घेऊन समुद्रात तिचा कागदपत्राविना वावर सुरु होता. त्यामुळे पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मासेमारीसाठी सर्व प्रकारच्या मासेमारीसाठी विशिष्ठ कालावधी आखून दिलेला असतो. बंदी काळात देखील मासेमारीसाठी समुद्रात उतरल्याने जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.
राज्याच्या जलधी क्षेत्रात विनाकागदपत्र वावर करीत असताना तसेच एलईडी मच्छीमारीस बंदी असतानाही नौकेवर जनरेटर व एलईडी साहित्य आढळून आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. संबंधित नौकेवर तांडेलसह सात मच्छीमार होते. ही नौका विनाकागदपत्र राज्याचा जलधी क्षेत्रात वावर करीत होती. तसेच एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही या नौकेवर जनरेटर, एलईडी लाईट्स, बॅटऱ्या तसेच अन्य साहित्य आढळून आले. संबंधित नौकामालकाला मत्स्यव्यवसाय विभागाकडून नौकेसह सामान जप्तीची नोटीस देण्यात आली आहे.
केंद्राच्या आदेशाचा भंग, विनाकागदपत्र समुद्रात वावर, एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही मच्छिमारी करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार असल्याचे परवाना अधिकारी मालवणकर यांनी सांगितले. या कारवाईत मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक संतोष ठुकरूल, धाकोजी खवळे, अमित बांदकर, योगेश फाटक तसेच गस्ती नौका कर्मचारी सहभागी झाले होते.