21.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiriरत्नागिरी हापूस आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध

रत्नागिरी हापूस आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध

थेट आंबा उत्पादकांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरवात केली आहे.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या चवीची पोहोच कुठपर्यंत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. सध्या हापूसचा हंगाम सुरु झाल्याने मागणी सुद्धा जोरदार आहे. दरवर्षीच्या अपेक्षेपेक्षा यंदा वातावरणाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे आंबा प्रेमीना थोडी वाटच पहावी लागणार आहे. परंतु आंबाप्रेमींसाठी मात्र खुशखबर आहे कि, आता अ‍ॅमेझॉनवर देखील रत्नागिरीचा हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आत्ता हापूस आंबा सुद्धा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

महत्वाचे म्हणजे थेट आंबा उत्पादकांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरवात केली आहे. यामुळे ग्राहकांना आता घरबसल्या रत्नागिरी हापूसची चव चाखता येणार आहे. अ‍ॅमेझॉनने रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी भागामध्ये आंबा संकलन केंद्र चालू केले असून, सुरुवातीला १२ शेतकऱ्‍यांकडून कंपनीने ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रति डझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले आहे. व्यवहार सुद्धा रोखठोक असल्याने आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत.

भारतातील अ‍ॅमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुणे येथील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहोचवला जाणार आहे. रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी आणि इतर आंबा बागायतदार उपस्थित होते. भविष्यात देशाच्या काना कोपऱ्या‍मध्ये हापूस आंबा पोहोचवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉनच्या रूपाने बागायतदारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. दर्जेदार आंबा कंपनीला दिला तर बागायतदाराला चांगला दरही मिळेल. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकऱ्या‍‍ला दर ठरवता येणार आहे. हापूसला चांगला दर मिळवून देत असतानाच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते, औषधे, साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाणार आहे.

उद्‌घाटनप्रसंगी जोशी म्हणाले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षे बागायतदारांसाठी खूप कठीण गेली आहेत. अनेकांनी दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.  कोरोना काळापासून ऑनलाईनच व्यवसाय जास्त वाढल्याने, त्यानुसारच बदल केला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहता येणार आहे. आता पर्यंत सर्वच वस्तूंचे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्केटींग आणि विक्री केली जात होती. यामध्ये आता हापूसची देखील ऑनलाईन एंन्ट्री होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular