27.2 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024
HomeRatnagiriगणेशोत्सवाचे वारे वाहू लागले

गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले

कोकणामध्ये शिमगा आणि गणेशोत्सव मोठ्या जोशात साजरे केले जातात. गणेशोत्सव आता ३ महिन्यांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे अनेकांचे पिढीजात व्यवसाय असलेल्या गणेश चित्रशाळा गजबजायल्या लागल्या आहेत. गणेश चित्र शाळेमध्ये गणपतीच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. दरवर्षी गणपतीचा पाट कारखान्यात नेऊन देऊन आपल्याला कशा प्रकारची हवी असलेली गणेशाची मूर्तीचे वर्णन करून तयार करण्यास सांगितली जाते. मूर्तिकारही आपल्याकडील सर्व कलाकुसर वापरून सुबक मुर्त्या साकारायला सुरुवात करतात. पावसाच्या हंगामामुळे मुर्त्या सुकायला वेळ लागतो, त्यामुळे साधारण २-३ महिने आधीपासून विविध प्रकारच्या बाप्पाच्या मुर्त्या तयार करायला मूर्तिकार सुरुवात करतात.

मागील वर्षी कोरोनामुळे सगळे चित्रच पालटले. अनेक चाकरमान्यांना गावी येताही  न आल्याने काही जणांनी जिथे राहत आहेत त्याच ठिकाणी गणेशाची स्थापना केली. गेले दीड वर्ष देशभरात बसलेला कोरोनाचा विळखा काही सैल होण्याची चिन्ह नसल्याने अनेकांनी साध्या पद्धतीने घरीच उत्सव साजरा केला. यावर्षी देखील कोरोनाचे सावट या उत्सवावर घोंगावत आहे, त्यामुळे यावर्षी सुद्धा मुंबई पुण्याहून येणारे चाकरमान्यांची संख्या कमी झालेली दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ganeshmurti

गणपतीचे आगमन यावर्षी १० सप्टेंबरला होणार असल्याने, अनेक तालुक्यामध्ये चित्रशाळांमध्ये गणपती आकार घेऊ लागले आहेत. गेल्या वर्षीपासून सुरु असलेली संचारबंदी त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दापोलीचे मूर्तिकार मालगुंडकर यांनी सांगितले. मालगुंडकर हे साचा न वापरता हाती गणेशमूर्ती बनवितात, त्यामुळे ते सांगतात शेतीची कामातून वेळ मिळेल तसा, शाडू मातीच्या साचा न वापरता हस्तकलेतून गणेशाच्या मूर्ती साकारायला वेळ लागतो, त्यांनतर रंगकाम, त्यावरील बारीक सारीक कोरीवकाम करण्यास पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. त्यामुळे वेळ राखून हाती गणेशमूर्ती घडविण्याचे काम पूर्व नियोजन करून करावे लागते.

RELATED ARTICLES

Most Popular