32.2 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

जिल्ह्याला आज उष्मालाटेचा धोका, सतर्कतेच्या सूचना

प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त...

ना. नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी फटाके फोडत जल्लोष… 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीतील बहुप्रतिक्षित तिढा...

सूर्यकुमार यादवचे नंबर 1 स्थान धोक्यात, पाकिस्तानी फलंदाज जिंकू शकतात

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या...
HomeRatnagiriकारागृहातील बंदिवानांना दिला जातो सकस आहार

कारागृहातील बंदिवानांना दिला जातो सकस आहार

कारागृहात केवळ सराईत गुन्हेगारच असतात असे नाही तर काहीवेळा नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणारेही काही बंदिवान असतात.

रत्नागिरी येथील जिल्हा विशेष कारागृहात गुन्हेगार म्हणून कैद्यांची खाण्याची आबाळ न करता त्यांना पोषक आणि सकस आहार दिला जातो. येथे सध्या २२५ कैदी आहेत. त्यांच्यासाठी दररोज ५० किलो तांदूळ रांधला जातो. तर ३५ किलो गव्हाचे पीठ लागते. कारागृहातील बंदिवानांच्या आरोग्याची काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. महाराष्ट्र नियमावलीनुसार घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कैद्यांना आहार दिला जातो.

जिल्हा विशेष कारागृहाला काही वर्षापूर्वीच खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या कारागृहामध्ये शेती करण्यासाठी शिक्षा संपत आलेले २० कैदी आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षी तर सुमारे १५ लाखांहून अधिक शेती उत्पन्न घेण्यात आले. कोरोना काळातही कैद्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. कारागृह प्रशासन कैद्यांबाबत संवेदनशील आणि दक्ष असते.

कारागृहात केवळ सराईत गुन्हेगारच असतात असे नाही तर काहीवेळा नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणारेही काही बंदिवान असतात. गुन्हेगार किंवा बंदिवान म्हणून वागणूक न देता त्यांच्या आहाराबाबत कारागृह प्रशासन विशेष लक्ष देवून असते. येथील विशेष कारागृहातील १० महिलांसह २२५ बंदिजनांसाठी दररोज ५० किला तांदूळ आणि ३५ किलो गहू लागतो. कैद्यांच्या संख्येनुसार धान्याची मागणी केली जाते. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या डाळी आणि भाज्यांचा समावेश असतो. या ब्रिटिशकालीन कारागृहात २५० कैद्यांची क्षमता आहे.

महाराष्ट्र कारागृह नियमावलीने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कैद्यांना आहार दिला जातो.  कारागृहातील प्रत्येक कैद्याला सकाळी नाश्ता, दूध, चहा दिला जातो तर दुपारी आणि रात्री पोटभर जेवण दिले जाते. यात चपात्या, भात, डाळ, पालेभाज्या यांचा समावेश असतो.

RELATED ARTICLES

Most Popular