32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...
HomeChiplunअखेर नागावे येथील अरुंद पूल तोडून, नवीन पूल उभारण्याचे काम सुरु

अखेर नागावे येथील अरुंद पूल तोडून, नवीन पूल उभारण्याचे काम सुरु

कोयना प्रकल्पाचे काम संपल्यानंतर मागील १५ वर्ष रस्ते दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता.

चिपळूण अलोरे येथे कोयना प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा प्रकल्पाची यंत्रणा आणण्यासाठी पोफळी, शिरगाव, नागावे, पेढांबे आदी ठिकाणी जलसंपदा विभागाकडून रस्ता आणि पूल बांधण्यात आले होते. त्याकाळी या भागात वाहनांची ये-जा फारच कमी प्रमाणात होती. त्यामुळे साडे तीन मीटर रुंदीचे रस्ते आणि पूल बांधण्यात आले होते. नंतरच्या काळात हळूहळू या मार्गावरील वाहतूक वाढत गेली तशी या मार्गावर वाहनांची गर्दीही वाढली.

चिपळूण-पोफळी मार्गावर नागावे येथे अखेर अरुंद पूल तोडून नवीन पूल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. या मार्गावरील वाहतूक दुसर्या रस्त्याने सुरू रहावी, यासाठी नदीत मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीचा विचार करता दुपदरी पूल तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

अलोरे परिसरात कोयना प्रकल्पाचे काम सुरू असेपर्यंत, येथील रस्ते आणि पुलांची देखभाल दुरुस्ती जलसंपदा विभागाकडून केली जात होती. कोयना प्रकल्पाचे काम संपल्यानंतर मागील १५ वर्ष रस्ते दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. चिपळूणहून पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्रहून चिपळूणकडे धावणाऱ्या एसटीच्या सर्व गाड्या याच मार्गावरून धावतात. त्याशिवाय लोकल आणि लांबपल्ल्याची खासगी वाहतूक या मार्गावरून होते. नागावे येथील पूल फारच अरुंद असल्यामुळे या पुलावरून एकच गाडी मार्गस्थ होते. त्यामुळे एकाच वेळी पुलावर दोन वाहने आली तर वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रश्न येथे नेहमीच निर्माण होतो.

पेढांबेपासून अलोरे पोफळीपर्यंतचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्ती सुरू झाली. तत्कालीन आमदार सदानंद चव्हाण यांनी नागावे, पेढांबे येथील जुने अरुंद पूल तोडून नवीन पूल बांधण्याची मागणी शासनाकडे केली होती. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबतचा अंदाजपत्रक ही तयार करण्यात आले होते. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पुलाच्या उभारणीसाठी दोन कोटी चाळीस लाखांची तरतूद केली. त्यामुळे सदरचे काम सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular