26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरी-कोल्हापूर मार्ग दोन तास ठप्प, नाणीजजवळ पेट्रोलचा टँकर उलटला

रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग दोन तास ठप्प, नाणीजजवळ पेट्रोलचा टँकर उलटला

पेट्रोल सांडल्याने खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती.

रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर नाणीज इरमलवाडीनजीकच्या वळणावर इंधन वाहतूक करणारा टँकर उलटला. महामार्गावर इंधन सांडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती. या अपघातात चालक जखमी झाला आहे. या अपघातासंदर्भात पाली पोलिस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (ता. ११) सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर नाणीज- इरमलवाडीजवळील वळणावर सांगली ते रत्नागिरी अशी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर उलटला. यामध्ये टँकरचालक वैभव कृष्णाजी कुलकर्णी (वय ४२, रा. पेठनाका, इस्लामपूर, जि. सांगली) हे जखमी झाले.

त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे टँकरच्या टाकीतील पेट्रोल रस्त्यावर सांडले होते शिवाय टँकरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेट्रोल सांडल्याने खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारूती जगताप, पाली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कांबळे, महामार्ग वाहतूक पोलिस मदतकेंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रमसिंग पाटील, राहुल बोंद्रे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रावणंग, राजीव सावंत, पोलिस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular