26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeMaharashtraदहावी, बारावी परीक्षा शुल्कात वाढ

दहावी, बारावी परीक्षा शुल्कात वाढ

साधारणतः दरवर्षी राज्यातून दहावी आणि बारावीची सुमारे ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतात.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दहावीसाठी नियमित विद्याथ्र्यांना ४२० रुपये, तर बारावीसाठी ४४० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. सुधारित शुल्काची आकारणी करण्याबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे, अशी सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी विभागीय सचिवांना केल्या आहेत. परीक्षा नियोजन, पर्यवेक्षकांचे मानधन, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, वाहतूक, कलचाचणी आदी स्वरूपातील खर्च राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला करावा लागतो.

साधारणतः दरवर्षी राज्यातून दहावी आणि बारावीची सुमारे ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यांच्याकडून जमा होणाऱ्या शुल्कातून संबंधित खर्च मंडळ करते. या खर्चात सध्या वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेत शुल्कवाढीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार सुधारित शुल्क आकारणी केली जाणार आहे. पुनर्परीक्षार्थी, नियमित विद्यार्थी तंत्रविषयासह, श्रेणीसुधार, खासगी विद्यार्थी (फॉर्म नंबर १७), तुरळक विषयासाठीच्या शुल्कात देखील बदल झाला आहे.

यापूर्वी राज्य मंडळाने पाच वर्षांमागे परीक्षा शुल्कात वाढ केली होती.दरम्यान, राज्य मंडळाच्या सूचनेनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना या सुधारित शुल्क आकारणीबाबत कळविण्यात आले असल्याचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular