रत्नागिरीतील व्यापारी गेल्या दीड वर्षापासून शासनाने कोरोनाचे केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. पण तरीही सरकारच्या मते व्यापारी वर्गामुळेच कोरोना जास्त फैलावत आहे, त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवली तरच कोरोना आटोक्यात येईल. त्यामुळे व्यापारी वर्ग संताप व्यक्त करत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. मागील वर्षापासून ठप्प असलेले व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व व्यावसायिक शासनाकडे मागणी करत आहेत. अनेक येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे वादळ, वारा, पाऊस अशा काही न काही कारणांमुळे रत्नागिरी बाजारपेठ बंद ठेवण्यात येतच असते. पण या सगळ्याचा परिणाम व्यापार्यांच्या आर्थिक परीस्थितीवर होऊन त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.
कोरोना वाढीसाठी केवळ व्यापारीच जबाबदार असल्याचा शोध सरकारला लागला असल्याने संचारबंदी असताना देखील जनता फिरत आहे, केवळ व्यापार्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात येते त्यामुळे व्यापारी वर्गात एक प्रकारची नाराजी निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या असलेल्या परिस्थितीमध्ये मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी होताना दिसत असताना आता डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे जनतेत भीती पसरली आहे. आणि त्यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीमध्ये विसंगती असल्याने नागरिकसुद्धा संभ्रम अवस्थेत आहेत.
काही घडले तरी, हे चालू आणि ते बंद एवढच गेले वर्षभर ऐकण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यामध्ये एक मिश्कील चर्चा सुरु आहे कि, आता रत्नागिरीमध्ये फक्त डायनोसॉर यायचा बाकी राहिला आहे, तोही येणार आहे असे सांगून संचारबंदी करा. व्यापार्यांना भीती दाखवण्यासाठी आता डायनॉसोर रत्नागिरीमध्ये येणार नाहीत ना !