गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीला सगळीजण तोंड देत आहोत. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व काही ठप्प झाले आहे. नोकरदार वर्ग घरामधूनचं ऑफिसचे काम करत असल्याने, व्यवसाय, उद्योग धंदे कोरोन मुळे बंद झाल्याने सर्व जण घरीच बंद आहेत. दैनंदिन जीवनपद्धती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. अशा वातावरणामध्ये एखादा छंद जोपासणे अथवा संगीत, काव्य, कथा ऐकणे, लिहिणे, एखाद्या विषयावर व्यक्त होणे हे खूपच आल्हाददायक वाटत.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेद्वारे नाटयपंढरी वाचनकट्टा हा उपक्रम राबविण्यात आला होता. रत्नागिरी मधील अनेक कला रसिक मंडळीनी यामध्ये सहभाग घेतला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शताब्दी महोत्सवासाठी जानेवारी महिन्यापासून या कार्यक्रमाची आखणी आणि पूर्वतयारी सुरु होती. परंतु, साधारण मार्च पासुन झालेल्या कोरोना महामारीच्या आगमनाने सर्व जगच थांबले. कोरोना मात्र वेगाने फैलावत होता, आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधा अपुर्या पडत होत्या. अजूनही कोरोनाशी दोन हाथ करणे सुरूच आहे.
कोरोना काळामध्ये हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. हा कार्यक्रम जरी प्रत्यक्ष रित्या घेतला गेला नसला तरी, कुठेतरी व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याने कला रसिकांनी समाधान व्यक्त केले. सुरुवातील कोरोनाच्या भयानक स्थितीचा अंदाज नसल्याने फक्त १०० दिवसांसाठीच त्याचे आयोजन केले गेले होते, परंतु, कालांतराने मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद पाहून, वर्षभर हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामध्ये दीप्ती पंडित, पूर्व साने, नंदकुमार पाटील, केदार सामंत, सुप्रिया उकिडवे, शशी पेंडसे इत्यादी रत्नागिरीकरांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. ३१ मे रोजी या कार्यक्रमाची सांगता झाली. कला रसिकांना, विविध मान्यवरांना गौरविण्यात आले तसेच लॉकडाऊन असल्याने त्यांचे पुरस्कार घरी नेऊन देण्यात आलेत.