24.6 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeRatnagiriजिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरीअंटच्या अफवा-जिल्हाधिकारी मिश्रा

जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरीअंटच्या अफवा-जिल्हाधिकारी मिश्रा

रत्नागिरीमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन डेल्टा प्लस व्हेरीअंट बद्दल अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर मध्ये परदेशातून प्रवास करून आलेल्या काही प्रवाशांमुळे गावामध्ये डेल्टा प्लस सदृश्य स्ट्रेन सापडल्याच्या विविध बातम्या प्रसिद्ध होत होत्या, अगदी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी देखील राज्यातील डेल्टा प्लसच्या रूग्णांबद्द्ल माहिती देताना रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ९ रुग्ण असल्याचे म्हटले आहे. परंतु, जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यासंदर्भात झूम मिटद्वारे पत्रकार परिषद घेऊन संगमेश्वरमध्ये असा कोणताही स्ट्रेन सापडला नसल्याचा खुलासा केला आहे.

आज जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि संगमेश्वर गावात वेगळा स्ट्रेन आहे का ? याची तपासणी सुरु आहे. काही रुग्णांचे नमुने यापूर्वी तपासणीसाठी पाठविलेले असून, अजून १०० संशयित रुग्णांचे नमुने सुद्धा नुकतेच पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर आणि आरोग्य विभाग या संदर्भात काही माहिती जाहीर करत नाही, तो पर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच संगमेश्वर मधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी शासन नवनवीन धोरण अवलंबत आहे. या धोरणाप्रमाणे जिल्ह्यात नऊ रुग्ण सापडले असून ते कोणत्या स्ट्रेनचे आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही. प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोनाच्या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे, आणि ग्रामपंचायत भागामध्ये सुद्धा बाहेरून आलेल्या माणसांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग त्या त्या भागामध्ये विशेष खबरदारी घेण्याचे काम करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular