25.5 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeRatnagiriपोलिसांसाठी ई-लर्निग प्रशिक्षण

पोलिसांसाठी ई-लर्निग प्रशिक्षण

कोरोनामुळे गेले दीड वर्ष सर्व ऑफलाईन गोष्टी बऱ्याच प्रमाणात बंदच असल्यात जमा आहेत. सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु आहेत. अगदी मुलांच्या शिक्षणापासून ते घरातील किरणा जिन्नस आणण्यापासून सर्वच ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन कामाची माहिती नव्हती त्यांनी सुद्धा या सर्व गोष्टी आत्मसात केल्या.

रत्नागिरीमध्ये कोरोना काळामध्ये फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय स्टाफ, शासकीय नोकरदार वर्ग असे अनेक जण काम करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अजून हायटेक होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ई-ज्योती या ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. याबद्दल डॉ. गर्ग यांनी काही विशेष माहिती दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.गर्ग यांनी सांगितले कि, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अतिशय सतर्क राहावे लागते, एखादी लहानशी चूक सुद्धा अशा प्रसंगी घटक ठरू शकते. त्यामुळे ई-ज्योती ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे पोलिसांना आणखी कौशल्य आत्मसात करण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी तांत्रिक मदतीसाठी ५ नोडल अधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.

ratnagiri police e learning

नवीन भरती झालेले पोलीसांना सुद्धा या ई-ज्योती प्रणालीद्वारे पोलिसांसाठी आवश्यक असणारे अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. एखाद्या गुन्हेगाराचा शोध घ्यायचा असेल तर , त्या कामामध्ये कशा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे, गुन्ह्याची उकल कशी करावी इत्यादी अनेक गोष्टींसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलीस कर्मचार्याला हे प्रशिक्षण कोणत्याही क्षणी ऑनलाईन घेता येणार आहे. त्यासोबत घरी असताना सुद्धा या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular