25.1 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना…

क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा...
HomeRatnagiriरत्नागिरी पोलिसांचा मास्टर प्लान

रत्नागिरी पोलिसांचा मास्टर प्लान

जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून सुद्धा काही बेजबाबदार सुशिक्षित नागरिक विनाकारण रस्त्यांवर गाड्या घेऊन फिरताना दिसत आहेत. बर्याचदा समज देऊनही अशा लोकांच्या कृत्यामध्ये बदल झालेला दिसत नसल्याने रत्नागिरी पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. अशा बेजबाबदार लोकांना कुठेतरी चाप बसावा यासाठी जिल्ह्यात बर्याच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आणि कितीही कोणी अगदी कोणाचीही ओळख, वशिला सांगितला तरी पोलीस वाहनाची पूर्ण तपासणी करूनच पुढे पाठवत आहेत. आपल्या कर्तुत्वामध्ये कुठेही कसर राहू देत नाहीत.

जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी डॉ मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत माहिती दिली. जनतेला कोरोनाची स्थिती दिसत असून सुद्धा काही लोक बेजबाबदारपणे, दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावर गाडी घेऊन फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी केलेली ठराविक ठिकाणाची नाकाबंदी माहित असल्याने काही लोक छुप्या मार्गाने,आडमार्गाचा अवलंब करून कारणाशिवाय रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना रोख लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांनी एक मास्टर प्लान आखला आणि त्यामध्ये साधारण पाचशे च्या आसपास विनाकारण रस्त्यावर फिरणारे सापडले. जाणून घेऊया नेमका काय आहे मास्टर प्लान रत्नागिरी पोलिसांचा.

जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या ठिकाणी नाकाबंदी सुरु ठेवून जे छुपे मार्ग आहेत तिथे सुद्धा अचानक नाकाबंदी केली. त्यामुळे याची पुसटशी कल्पना नसणारे दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडले असता, पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यामध्ये काही जणांनी मास्क सुद्धा लावला नसल्याचे समोर आले आहे. पकडलेल्या लोकांना समज देऊन, काही जणांकडून दंड वसूल करून सोडण्यात आले. या मास्टर प्लान बद्दल कळल्यामुळे अशा विनाकारण भटकंती करणार्याची संख्या कमी झाली आहे.

काही लोक पोलिसांना फसवून आडमार्गाने विनाकारण फिरताना दिसतात, अशा लोकांनी विचार केला पाहिजे कि, यामध्ये धोका तुमच्याच जीवाला आहे. पोलीस त्यांची योग्य ती कारवाई करणारच. वेगाने वाढणाऱ्या कोरोनाला आळा बसण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मास्टर प्लानचा वापर जिल्ह्यामध्ये कधीही केला जाऊ शकतो, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी गर्ग यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular