27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriलांजा, राजापूरसह रत्नागिरीतही पाऊस, बागायतदार धास्तावले

लांजा, राजापूरसह रत्नागिरीतही पाऊस, बागायतदार धास्तावले

रत्नागिरी शहर परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर विजांसह अवकाळी पाऊस पडला.

तालुक्यांमध्ये रत्नागिरी, लांजा आणि राजापूर सोमवारी अनेक ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार धास्तावले आहेत. रत्नागिरी शहर आणि परिसरात वीजांच्या कडकडाटासह सोमवारी मध्यरात्रीनंतर पाऊस कोसळला. तर मंगळवारी दिवसा पावस, पूर्णगड, गावखडी परिसरासह कोतवडे, नेवरे, मालगुंड परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापूर शहरात सोमवारी रात्री ९ वा.च्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. मात्र पावसाला जोर नव्हता. केवळ पावसाचा शिडकावा झाला. मात्र राजापूर शहराजवळील आसपासच्या गावांमध्ये जोरदार पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे. राजापूरप्रमाणेच लांज्यातही सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

चांगलाच पाऊस कोसळला. अवकाळी पाऊस सुरु होताच अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. अनेक गावांमध्ये सोमवारी रात्री वीजपुरवठा सुरु नव्हता. तरं काही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान होईल असा अंदाज बांधला जात आहे. रत्नागिरी शहर परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर विजांसह अवकाळी पाऊस पडला. कीड रोगांमुळे आंबा कलमांवर सातत्याने फवारणी करावी लागतं आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते.

सोमवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेल्या फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. नामितीयानी रत्नागिरी शहरात रात्री १ वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास अर्धा एक तास सुरू होता. मंगळवारी सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी पावस, गावखडी, गोळप, कसोप, फणसोप आदी अनेक गावात अवकाळी पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी तालुक्यात अनेक गावांमध्ये सोमवारी रात्री वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले तर वीजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांची झोप उडवली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular