26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriसावकारी व्यवसायात रत्नागिरी तालुका अग्रेसर

सावकारी व्यवसायात रत्नागिरी तालुका अग्रेसर

जिल्ह्यात मागील दहा वर्षात परवानाधारक सावकारांची संख्या वाढली असली तरी पाच तालुके सावकारीविरहित आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यंतरी सावकारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात फोफावली होती. परवानाधारक सावकार व्यापाऱ्यांसह इतरांनाही कर्ज देतात. अशा सावकारांची संख्या जिल्ह्यात वेगाने वाढत चालली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या नोंदीनुसार २००९-१० मध्ये रत्नागिरी तालुक्यात १६ परवानाधारक सावकार होते. ही सावकारांची संख्या २०१९-२० नुसार ५० वर पोहचली आहे.

चिपळूण तालुक्यात दहा वर्षांपूर्वी ३ परवानाधारक सावकार होते. ते आता १५ झाले आहेत. खेड तालुक्यात दोन आणि संगमेश्वरात एक परवानाधारक सावकार आहे. दहा वर्षांपूर्वी मंडणगड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी एक सावकार होता; मात्र तेथील सावकारी परवाने नूतनीकरण केले नसल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही परवानाधारक सावकार नाही. खेडमधील दोन सावकारांकडून कोणत्याही व्यापाऱ्यांनी २००९-१० मध्ये कर्ज घेतलेले नाही.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या नोंदीनुसार ४ तालुक्यातील ६८ सावकारांकडून कोणत्याही व्यापाऱ्याने कर्ज उचल केलेली नाही; मात्र तब्बल ४५ हजार ८६३ इतर व्यक्तींनी कर्ज उचल केली. दरम्यान, १० वर्षापूर्वी मंडणगड तालुक्यात १ परवानाधारक सावकार होते; मात्र त्यांच्याकडून एकाही व्यापार्‍याने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने कर्ज उचल केलेली नाही. आता या तालुक्यात परवानाधारक सावकार नाही.

चिपळूण तालुक्यातील ३ सावकारांनी १० वर्षांपूर्वी १४० व्यापाऱ्यांना कर्जे दिली होती. या व्यतिरिक्त इतर कोणालाही कर्ज दिलेले नाही. २०१९-२० मध्ये चिपळुणात १५ सावकार झाले असून त्यांच्याकडून ४ हजार ९६ व्यक्तींनी कर्ज घेतली. व्यापाऱ्यांनी मात्र चिपळुणातील सावकारांकडून कर्ज उचलेले नाही. दहा वर्षापूर्वी लांजातील एका सावकाराने ११० व्यापाऱ्यांना कर्ज दिले होते. लांजा तालुक्यात आता एकही परवानाधारक सावकार कार्यरत नाही.

जिल्ह्यात मागील दहा वर्षात परवानाधारक सावकारांची संख्या वाढली असली तरी पाच तालुके सावकारीविरहित आहेत. मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, राजापूर तालुक्यात अधिकृत परवानाधारक सावकारी व्यवसाय नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular