24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, रत्नागिरी एसटी विभागाने ११ फेऱ्या केल्या बंद

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, रत्नागिरी एसटी विभागाने ११ फेऱ्या केल्या बंद

रत्नागिरी एसटी विभागाने मंगळवारी बेळगाव, विजापूर, हुबळीला जाणाऱ्या ११ फेऱ्या रद्द केल्या. कोल्हापूरपर्यंत या फेऱ्या सुरू आहेत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकार अधिक कठोर भूमिका घेत असल्याने कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सीमाभागावर हल्ले करून वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राची वाहने हेरून हे हल्ले होत असल्याने राज्यात सुद्धा असंतोष पसरला आहे.

सीमाभागावर अजूनही वातावरण धुमसत असून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने ही खबरदारी घेऊन कर्नाटकाकडे होणारी एसटी वाहतूक कालपासून बंद ठेवली आहे. पुढील आदेशापर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर या वादाचा परिणाम झाला आहे. रत्नागिरी एसटी विभागाने मंगळवारी बेळगाव, विजापूर, हुबळीला जाणाऱ्या ११ फेऱ्या रद्द केल्या. कोल्हापूरपर्यंत या फेऱ्या सुरू आहेत, तर कर्नाटक डेपोनेही रत्नागिरीत येणाऱ्या ८ फेऱ्या रद्द ठेवल्या आहेत.

अन्य जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज ३३० एसटी फेऱ्या सुरू होत्या; मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एसटी गाड्या, प्रवाशांना फटका बसू नये यासाठी पोलिसांच्या सूचनेवरून ही एसटी वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. कोल्हापूरपर्यंत या फेऱ्या सुरू असल्याने एसटीच्या उत्पन्नावर तसा फारसा परिणाम झालेला नाही. याला एसटी विभागाने दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असून, महाराष्ट्रातील वाहनांवर तेथील कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले झाले. यामध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्याचा मोठा परिणाम एसटीच्या सार्वजनिक वाहतुकीवर झाला. राज्याच्या विविध भागातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या आहेत. त्या कालपासून रद्द करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular