27.7 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKhedलोटे डिवाईन केमिकल कंपनीला सेफ्टी क्लोजरची नोटीस

लोटे डिवाईन केमिकल कंपनीला सेफ्टी क्लोजरची नोटीस

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कोल्हापूर येथील क्षेत्रीय अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी या संदर्भात आदेश दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी सकाळी डिवाईन केमिकल या कंपनीत स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकूण ८ कामगार होरपळले होते. त्यापैकी ५ जणांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला असून अजून दोन जणांवर उपचार सुरू आहेत, तर एकजण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटना घडल्यानंतर कंपनीत धाव घेवून या दुर्घटनेचे कारण काय, याची चौकशी सुरू केली होती.

लोटे येथील दुर्घटनाग्रस्त डिवाईन केमिकल कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सेफ्टी क्लोजरची नोटीस देण्यात आली असून घटना घडलेल्या प्रभावित क्षेत्रात काम सरू न करण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कोल्हापूर येथील क्षेत्रीय अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी या संदर्भात आदेश दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या चौकशीअंती सादर केलेल्या अहवालात एमपीसीबीने कंपनीला दिलेल्या नोटीसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ही आग लागली, त्या ठिकाणी गोदामात सुमारे ४० नगर ड्रम, अर्धे तयार आणि तयार माल ठेवण्यात आला होता. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्योगाच्या गोदामात आगीची घटना घडली आणि येथे नमूद केलले साहित्य आणि प्रशासकीय कायालय इत्यादी पूर्णपणे खराब झाल्याचे आढळले.

कंपनीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत असल्याचा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम १९६१, १९६१ १ च्या जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ आणि ३१ चया कलम ३३ नुसार ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी काम बंद करणे, सक्षम अधिकारी आणि इतर सक्षम विभागांच्या मंजुरीपर्यंत उत्पादन क्रियाकलाप पुन्हा सुरू न करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular