24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriइलेक्ट्रीक वाहनांसाठी माझी वसुंधरा योजनेंतर्गत रत्नागिरीत उभारणार चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रीक वाहनांसाठी माझी वसुंधरा योजनेंतर्गत रत्नागिरीत उभारणार चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रीक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर २५ किलोमीटरवर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

दिवसेंदिवस इंधनांच्या वाढत जाणाऱ्या किमती लक्षात घेता, जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देखील अजून दोन चार वर्षांनी भारतात केवळ इलेक्ट्रिक वाहनेच दृष्टीस पडतील. आणि त्यांच्या चार्जिंग पॉइंटसाठी स्टेशन तयार करण्याचा विचार मोठ्या प्रमाणात होत आहे.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर २५ किलोमीटरवर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात ३१७ चार्जिंग केंद्राची उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर रत्नागिरी पालिकेने विद्युत वाहनांसाठी रत्नागिरी शहरात पाच ठिकाणी मोफत चार्जिंग सेंटर उभारणीचे काम हाती घेतले आहे.

माझी वसुंधरा योजनेंतर्गत रत्नागिरी पालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ६८ शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठी २ हजार ८७७ चार्जिंग केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे.

या टप्प्यात मंत्रालयाने,  देशातील १६ राष्ट्रीय महामार्ग आणि ९ द्रूतगती महामार्गावर १ हजार ५७६ चार्जिंग केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात मंजूर केलेल्या चार्जिंग केंद्राची संख्या आणि ज्या शहरांमध्ये ही सुविधा उभारली आहे त्याचा तपशिल मागवला आहे.

त्याच अनुषंगाने रत्नागिरी पालिकेने शहरामध्ये अशी पाच चार्जिंग केंद्र उभारण्यास सुरूवात केली आहे. हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विजेवर चालणार्‍या वाहन खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मंत्र्यांची वाहने हि इलेक्ट्रिक पद्धतीचीच असावी अशी इच्छा व्यक्त केली होती, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular