28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeRatnagiriरत्नागिरीतील खेळाडू उत्कृष्ट परंतु, अत्यावश्यक सोईसुविधांचा अभाव - तज्ञ प्रशिक्षक दिनेश लाड

रत्नागिरीतील खेळाडू उत्कृष्ट परंतु, अत्यावश्यक सोईसुविधांचा अभाव – तज्ञ प्रशिक्षक दिनेश लाड

येथील खेळाडूंमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक दर्जेदार सुविधा दिल्यास रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू घडु शकतात.

रत्नागिरी जिल्ह्यातून अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत विविध खेळांमध्ये पारंगत खेळाडू आहेत. गरज आहे ती केवळ योग्य मार्गदर्शन आणि तज्ञ मार्गदर्शकाची. रत्नागिरीवर भेटी दरम्यान रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरसारखे खेळाडूना मार्गदर्शन करणारे तज्ञ प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रत्नागिरीतील खेळाडूंबद्दल गौरवोद्गार काढले परंतु, अत्यावश्यक असलेल्या सोईसुविधांचा अभाव असल्या कारणाने खंत देखील व्यक्त केली.

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडांगणासारखे मोठे मैदान क्रिकेट खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. येथील खेळाडूंमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक दर्जेदार सुविधा दिल्यास रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू घडु शकतात. यासाठी असोसिएशनने पुढाकार घेवून बारा ते चौदा वर्षाखालील खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करायला हवे. रत्नागिरीमध्ये मैदान मोठे आहे, पण त्याला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मात्र उपलब्ध मात्र नाहीत,  असे प्रतिपादन प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले.

पुढे सांगताना ते म्हणाले कि, रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर याआधी अनेक रणजी सामने झाले आहेत. त्यादृष्टीने टर्फची खेळपट्टी बनविणे आवश्यक आहे. येथील ऍकॅडमीत प्रशिक्षण घेणारी मुले मॅटवर खेळतात. मॅटवर आणि प्रत्यक्षात टर्फ खेळपट्टीवर खेळणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे येथील खेळाडूंना जर क्रिकेटमध्ये आपले भविष्य घडवायचे असेल तर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शरांचा आधार घ्यावा लागतो.

त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू बनवायचा असेल तर चांगल्या खेळपट्ट्या बनवताना १२ ते १६ वयोगटातील खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी असोसिएशनने खेळाडूंची निवड करून त्यांच्यासाठी एक तज्ञ प्रशिक्षक नेमावा. जेणेकरून खेळाडूना येणाऱ्या अडचणी, समस्या यांचे निराकरण इथेच करणे शक्य होईल.

RELATED ARTICLES

Most Popular