४ एप्रिल २०२२ रोजी अनबॉक्स फुड डिलिव्हरी ॲपप्लिकेशन च्या चिपळूण शाखेला एक वर्ष पूर्ण होत आहे. रत्नागिरीतील प्रथितयश तरुण उद्योजक श्री. गौरांग आगाशे ह्यांनी ७ जून २०२० रोजी रत्नागिरी शहरामध्ये अनबॉक्स युअर डिझायर ह्या ऑनलाईन फुड डिलिव्हरी अँप्लिकेशन ची सुरुवात केली. त्यावेळी लॉकडाऊन च्या काळात स्थानिक हॉटेल व्यावसायिक तसेच ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने अनबॉक्स ने आपल्या कामाला सुरुवात केली. वाजवी दरामध्ये उत्कृष्ट सेवा देत अल्पावधीतच अनबॉक्स ॲपप्लिकेशन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आणि रत्नागिरी च्या फुड इंडस्ट्री चे अविभाज्य घटक बनले.
खास लोकाग्रहास्तव ४ एप्रिल २०२१ रोजी अनबॉक्सने आपली सेवा चिपळूण शहरामध्ये सुरु केली. चिपळूण फ्रेंचाइझी होल्डर सौ. स्पृहा आठल्ये आणि श्री. सौरभ आठल्ये ह्यांनी चिपळूण मधील स्थानिक कुरिअर व्यावसायिक श्री. सचिन कुलकर्णी ह्यांच्या मदतीने अत्यंत मेहनतीने आणि नियोजन बद्ध पद्धतीने ही सेवा चिपळूण मध्ये यशस्वी रित्या चालवून लोकप्रिय केली. आज रोजी नुसत्या चिपळूण शहरामध्ये ७० पेक्षा जास्त हॉटेल्स अनबॉक्स वर उपलब्ध आहेत. ह्या प्रवासाबद्दल बोलताना सौ. स्पृहा आठल्ये असे म्हणतात कि चिपळूण मधील हॉटेल व्यावसायिकांचे सहकार्य आणि विश्वास, आमच्या असंख्य ग्राहकांचे प्रेम,आमच्या डिलिव्हरी बॉईज आणि ऑफिस स्टाफ ची मेहनत, श्री. गौरांग आगाशे ह्यांचा भक्कम पाठिंबा आमचे कर सल्लागार श्री.शरद वझे व सौ गायत्री वझे ह्यांचे मार्गदर्शन तसेच आमचे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आर्यक सोल्युशन्स ह्यांचा टेक्निकल सपोर्ट ह्यामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
आज रोजी अनबॉक्स रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ व कोल्हापूर तसेच केरळ मधील एका शहरामध्ये कार्यरत आहे. लाखो ऑर्डर्स अनबॉक्स ने यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत. आम्ही जपतो खवय्यांची आवड ह्या ब्रिदवाक्याला धरून झटपट आणि सुरक्षित फुड डिलिव्हरी सोबतच मेडिसिन्स आणि ग्रोसरीची होम डिलिव्हरी अनबॉक्स आज करीत आहे. हे ॲपप्लिकेशन प्ले स्टोअर तसेच ॲप स्टोअर वर देखील उपलब्ध आहे. यापुढचा अनबॉक्स चा प्रवास देखील असाच मजलदरमजल करीत अनेक ग्राहकाभिमुख नवीन सेवा देत यशस्वीपणे सुरु राहिल असा विश्वास सौ. स्पृहा आठल्ये आणि श्री गौरांग आगाशे ह्यांनी व्यक्त केला आहे.