34.8 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या...

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...
HomeRajapurबारसूमध्ये रिफायनरी उभारणारच ! माती परीक्षणाचा अहवालही अनुकुल - मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

बारसूमध्ये रिफायनरी उभारणारच ! माती परीक्षणाचा अहवालही अनुकुल – मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

आचारसंहितेमुळे महाराष्ट्रात शासकीय पातळीवर याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी होणारच अशी ग्वाही देत बारसू येथील मृदापरीक्षण तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही अडचणी राहिलेल्या नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आणि केंद्रासह कंपनीच्या उच्चपदस्थांशी चर्चा करण्याचे काम सध्या सुरू अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता राजापुरातील बारसू औद्योगिक वसाहतीत सुरू होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. याआधी रिफायनरी प्रकल्प राजापुरातील नाणारमध्ये उभारण्याचे ठरले होते. मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला आणि तेव्हा सत्तेम ध्ये असूनही शिवसेनेने स्थानिकांच्या बाजूने उभे राहत नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सुचविली होती. याठिकाणी रिफायनरी उभारण्यास अजूनही अनेक स्थानिकांचा विरोध आहेच. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

बोलणी सुरू – दरम्यान महाराष्ट्राकडून या प्रकल्पासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आराम्को कंपनीने आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही म हिने बोलणी सुरू केली असल्याचे वृत्त होते. केंद्र सरकारने अन्य राज्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्याबाबत भूमिका घेतल्याने महाराष्ट्राने हा प्रकल्प गम ावल्याची चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा  फेटाळून लावल्या आहेत. संबंधित कंपनीशी बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले. १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक देशात सुमारे १०० दशलक्ष  डॉलर्सची गुंतवणूक तेल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा सौदी आराम्को कंपनीचा मानस आहे. नाणारनंतर आता  बारसूमध्ये हा प्रकल्प उभारण्याचा विचार झाला आहे.

माती परीक्षणाचा अहवाल – यासांठी बारसूमधील मातीची तपासणी करण्यात आली होती. बारसूचा मृदापरीक्षण अहवाल सकारात्मक आहे. त्यामुळे राज्यात हा प्रकल्प उभारण्यास कोणत्याही अडचणी नाहीत. प्रकल्पासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याचे आणि केंद्र सरकारसह कंपनीच्या उच्चपदस्थांशी चर्चा करण्याचे काम सध्या सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. बारसूमधील जागेची दीड वर्षांपूर्वीच तांत्रिक चाचणी घेण्याचे काम झाले असून अहवालाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.

आचारसंहितेमुळे उशीर – हा प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्रात शासकीय पातळीवर याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे वेगाने काम सुरू होईल. आराम्को कंपनीने सागरी किनारपट्टी असलेल्या गुजरात आणि आंध्र प्रदेश सरकारशी चर्चा सुरू केली होती. किमान २० दशलक्ष टन क्षमता असलेला तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात राज्य सरकारची कंपनीशी बोलणी सुरू आहेत. राज्याचा विकास अर्थकारणाला मोठा हातभार लावणारा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा असे आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular