नवीन वाळू धोरणात हातपाटी वाळूला सामावून न घेतल्याने तसेच हातीपाटीचे परवाने दिले जात नसल्याने हातपाटी वाळू व्यावसायिक कमालीचे संतापले असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी चिपळूण प्रांत कार्यालयासमोर सोमवार आमरण उपोषणाला सुरुवात पासून केली आहे. पहिल्याच दिवशी या उपोषणाला उत्स्फुर्त असा पाठिंबा मिळाला असून जोपर्यंत दखल घेतली जात नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. राज्य सरकारने वाळू उत्खनन व पुरवठा यासाठी नवीन धोरण सुरू केले असून त्यानुसार ६०० रुपये ब्रास या, दराने वाळू विक्री करण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच या धोरणानुसार स्रकार अनुदान देणार आहे. परंतु या धोरणात पारंपरिक हातपाटी वाळूचा समावेश अद्याप करण्यात आलेला नाही. तर ड्रेझरद्वारे वाळू उपशाला मात्र परवानगी देऊन त्यांचे गट तयार करून त्यानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करून दोन गटांना परवाने देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे ड्रेझरद्वारे वाळू उपसा सुरू देखील करण्यात आला आहे. साहजिकच ड्रेझरवाले तुपाशी आणि हातपाटी व्यावसायिक उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप हातपाटी व्यावसायिक करत आहेत.
आमरण उपोषण सुरु – आपल्यावर सरकार जाणूनबुजून अन्याय करत असल्याचा थेट आरोप करत चिपळूण मधील हातपाटी व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन लक्ष केंद्रित केले होते. तसेच प्रशासनाने व सरकारने दखल घेतली नाही तर १८ डिसेंम्बर पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील त्यावेळी व्यावसायिकांनी दिला होता. त्यांच्या निवेदनाची कोणतीच दखल न घेतल्याने अखेर सोमवारी सकाळ पासून उपोषण सुरू केले.
जोरदार घोषणाबाजी – सोमवारी सकाळी चिपळूण मधील समस्त हातपाटी वाळू व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. नवीन वाळू धोरणात हातपाटी वाळूचा समावेश करून ट्रेझर प्रमाणेच आम्हाला देखील परवाने देण्यात यावेत.हातपाटी वाळू उपशाचे गट निर्माण करण्यात यावेत, तसेच सरकारच्या धोरणानुसार अनुदान देण्यात यावे आशा विविध मागण्या घेऊन हे उपोषण सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी उपोषणाला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.
उपोषणकर्त्यांचा निर्धार – काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित दादा गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठीं व्यक्त केला. तसेच तहसीलदार प्रवोण लोकरे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. प्रांताधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही. परंतु उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.