गेल्या सरकारच्या काळात, विकास झालाच नाही, मी रत्नागिरीचा आमदार असतानाही मला सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले गेले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात भूमिका घेण्यासाठीच ही नियुक्ती केली गेली, असा घणाघाती आरोप पालकमंत्री ना. उदय सामंत विरोधकांनी मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी आपण विकासकामांमधूनच त्याचे उत्तर देवू असे प्रतिपादन पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येथे केले. रविवारी रत्नागिरीप्त त्यांच्याहस्ते तब्बल १२२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन संपन्न झाले. यावेळी प्रभाग क्र.३ मध्ये ध्यानकेंद्राचे भूमिपुजन प्रसंगी ना. उदय सामंत बोलत होते.
यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, स्थानिक नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, माजी नगराध्यक्षा सौ. राजेश्वरी शेट्ये यांच्यासह शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवक राजन शेट्ये यांच्या कामाचा विशेष गौरव केला. प्रभाग क्र. ३ मध्ये आल्यावर अधिकाधिक कामे करण्याची उर्जा आम्हाला मिळते, अशा पद्धतीने राजन शेट्येंनी येथे काम केले आहे, लोकांशी संपर्क ठेवला आहे. लोकांच्या ते संपर्कात असतात म्हणूनच लोकंही त्यांना भरभरुन मतदान करतात. एकूण मतदानापैकी ८० टक्के मते आपणाला मिळतील असा विश्वासदेखील ग. उदय सामंत, यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधी पक्षातील काही मंडळी अपप्रचार करत आहेत, बदनामी करत आहेत. मात्र त्यांच्या या आरोपांना विकासकामांच्या माध्यमातूनच उत्तर देवू असे ते म्हणाले. त्यांच्या टीकेला मी किंमत देत नाही. तुम्हा सर्वांचे पाठबळ ही माझी उर्जा आहे. जोपर्यंत सामान्य जनतेचे प्रेम माझ्यासोबत आहे तो पर्यंत मला कोणाचीही भिती नाही. आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीची सत्ता येईल आणि त्यानंतर शहराच्या विकासकामांना अधिक गती देवून कायापालट करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, रविवारी प्रभाग क्र.२ मध्ये शिर्के उद्यानाच्या कामाचा शुभारंभ देखील नाःउदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. येथे विठुरायाची भव्य मुर्ती उभारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ कर्ताना पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवक निमेश नायर यांच्या कामाचेही कौतुक केले. यावेळी पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीविषयी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ना. सामंत म्हणाले की, माझे बंधु किरण सामंत हे खासदार व्हावे असे अनेकांना वाटते. केवळ माझ्या. पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेकांचा त्यांच्याशी संपर्क आहे. त्यांनाही ते खासदार व्हावे असे वाटते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.