पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, परतीच्या प्रवासासाठी खेड रेल्वेस्थानकात गर्दी केलेली दिसून येत आहे. खेड रेल्वेस्थानकात काल संध्याकाळपासूनच बाप्पांना निरोप देऊन पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओढा दिसून येत आहे. गणेशोत्सवा दरम्यान खेड -दापोली-मंडणगड या ठिकाणी आलेले गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने देखील उत्तम अशी व्यवस्था केलेली दिसून येत आहे. १३, १४ व १५ या तीन दिवसांसाठी खेड येथून एक विशेष रेल्वेगाडी मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे तळकोकणातून येणाऱ्या बऱ्याचशा रेल्वेगाड्यांवर पडणारा प्रवाशांचा भार हा या विशेष रेल्वेमुळे कमी होणार आहे. चाकरमानी परतीच्या प्रवासाला कोकण रेल्वेवर अवलंबून असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कोकण रेल्वेमार्गावर नियमित धावणाऱ्या रत्नागिरी दादर, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी दिवा, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस या गाड्याव्यतिरिक्त काही गणपती स्पेशल गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. खेड स्थानकात तालुक्यासह दापोली व मंडणगड तालुक्यांतील अनेक गावातील चाकरमान्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मुंबईला जाणाऱ्या सर्वच गाड्या थेट राजापूरपासूनच भरून येत असल्याने आरक्षित डब्यात खेड स्थानकातून चढणेही मुश्कील झाले.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्था – कोकण रेल्वे प्रशासनाने देखील चाकरमान्यांसाठी उत्तम अशी व्यवस्था केलेली दिसून येत आहे. १३, १४ व १५ या तीन दिवसांसाठी खेड येथून एक विशेष रेल्वेगाडी मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तळकोकणातून येणाऱ्या बऱ्याचशा रेल्वेगाड्यांवर पडणारा प्रवाशांचा भार हा या विशेष रेल्वेमुळे कमी होणार आहे.