28.6 C
Ratnagiri
Sunday, February 22, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeRatnagiriकोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी 'लालपरी' सज्ज

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

दरवर्षी हजारो कोकणी बांधव होळीच्या निमित्ताने गावी परततात.

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, देवभेटी, जत्रा आणि पारंपरिक कार्यक्रम ांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. या. पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने (एसटी) यंदाही विशेष नियोजन हाती घेतले कोकणात असून, प्रवाशांसाठी तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड या विभागांतून या जादा फेऱ्या धावणार आहेत. होळीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागः ७९ फेऱ्या, मुंबई विभाग ६२ फेऱ्या, पालघर विभागः २४ फेऱ्या (पूर्णपणे गट आरक्षणासाठी), रत्नागिरी विभाग : २१ फेऱ्या, रायगड विभागः ३३ फेऱ्या (आरक्षित प्रवाशांसाठी), एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी उपलब्ध असतील, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. गावोगावी होणाऱ्या होळ्या, पालख्या, पारंपरिक नृत्य, देवभेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरणात उत्साह असतो. त्यामुळे दरवर्षी हजारो कोकणी बांधव होळीच्या निमित्ताने गावी परततात. गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी गट आरक्षणाला प्राधानं देण्यात आले आहे शिमगात्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. गावोगावी होणाऱ्या होळ्या, पालख्या, पारंपरिक नृत्य, देवभेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रम ांमुळे वातावरणात उत्साह असतो त्यामुळे. दरवर्षी हजारो कोकणी बांधव होळीच्या निमित्ताने गावी परततात.

एसटीच्या या विशेष मोहिमेमुळे संभाव्य, गैरसोय टळणारं असून, प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. शिमगोत्सवाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ‘लालपरी पुन्हा एकदा कोकणाच्या दिशेने सज्ज झाली आहे. एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार दि. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी सर्वाधिक प्रवासी कोकणाकडे रवाना होण्याची शक्यता आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी ९१ फेऱ्या, दि. १ मार्च रोजी ५९ फेऱ्या होतील. या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular