27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriशिवसेनेच्या शिंदे गटाचा उद्या रत्नागिरीत मेळावा

शिवसेनेच्या शिंदे गटाचा उद्या रत्नागिरीत मेळावा

सोमवार दि. १४ रोजी सायंकाळी ५.३० वा. स्वा. सावरकर नाट्यगृहात हा मेळावा पार पडणार आहे.

नुकताच रत्नागिरीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे गटाचा मेळावा सोमवारी पार पडणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्वत: ना. सामंत या मेळाव्याच्या तयारीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन बैठका घेत आहेत. भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदभार हाती घेताच आपले काम सुरू केले आहे. संघटन बांधणीसाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. माजी खा. निलेश राणे यांनीही त्यांच्यासोबत उभे राहत साथ दिली आहे. स्वाभिमान संघटनेतील अनेक कार्यकर्तेही भाजपसोबत एकत्रित काम करताना पहायला मिळत आहेत.

सावंत यांनी जिल्हा परिषद गटनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने गेल्या काही काळात जि.प. गटनिहाय बैठका घेतल्या. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या या बैठकांना  चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात ठाकरे गटाने काही – सामाजिक प्रश्नांवर आंदोलनेही केली. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचा मराठा हॉलमध्ये शहराचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याची शहरभर चर्चा झाली. या सर्व राजकीय घडामोडी घडत असतानाच आता सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाचा शहराचा मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे.

गेले काही दिवस यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. स्वत: ना. सामंत हे ऑनलाईन तसेच ऑफलाईन बैठका घेत आहेत. माजी नगरसेवक तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांवर त्यांनी विशिष्ट जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. एकप्रकारे ना. सामंत हे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. सोमवार दि. १४ रोजी सायंकाळी ५.३० वा. स्वा. सावरकर नाट्यगृहात हा मेळावा पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular