27.6 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriआमदार राजन साळवी यांची आज एसीबीकडून चौकशी

आमदार राजन साळवी यांची आज एसीबीकडून चौकशी

अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात चौकशीला निघालेले आमदार साळवी हे शक्तिप्रदर्शन करत ते आज अलिबाग येथे रात्री उशिरा दाखल झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीनंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीची नोटीस पाठवली होती. साळवी यांना एसीबीने आज अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यासाठी शक्तिप्रदर्शन करत ते अलिबागमध्ये रात्री उशिरा दाखल झालेत. आमदार साळवी यांना बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्याने रत्नागिरीत एकच खळबळ उडालेली.

चिपळूणमधील कार्यकर्त्यांकडून राजन साळवी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.  चिपळूण पाठोपाठ खेडमध्येही कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी विविध ठिकाणी साळवी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात चौकशीला निघालेले आमदार साळवी हे शक्तिप्रदर्शन करत ते आज अलिबाग येथे रात्री उशिरा दाखल झाले.

मंगळवारी सकाळी ते रत्नागिरी येथून निघाल्यावर त्यांचे विविध ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आले. शिवसेना आमदार राजन साळवी चिपळूणमध्ये दाखल झाल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजन साळवी यांच्या स्वागतासाठी बहादूर शेख नाका येथे जमले होते.

तेंव्हा ते म्हणाले कि, आपण गेली चाळीस वर्षे शिवसेनेत आहोत. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. शिवसेनेत मध्यंतरीतरी स्थित्यंतरे झाली, पण मी शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. माझ्याकडून कधीही कोणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही. कितीही आणि कोणत्याही प्रकारच्या नोटीशी येऊ देत, आपण त्यांना भीक घालत नाही, अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका राजन साळवी यांनी मांडली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular