30.3 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraशिवाजी पार्क मैदान परंपरेप्रमाणे आम्हाला द्यावे – शिवसेना

शिवाजी पार्क मैदान परंपरेप्रमाणे आम्हाला द्यावे – शिवसेना

शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानाबरोबरच त्यांनी बांद्रा येथील एमएमआरडीए मैदानासाठी अर्ज केला होता व तेथे त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

शिंदे गट आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील उभा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुरुवातीला आरोपांपर्यंत असलेला वाद आता रस्त्यावरच्या लढाईत रुपांतरीत होताना दिसत आहे. शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यासाठी यंदा शिवाजी पार्क मैदान मिळणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी शिवसेनेने मात्र शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. परवानगी मिळो अथवा नाही, दस-याला शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर जमतील, असे शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून घ्यावे यासाठी २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला आहे. त्याबाबत निर्णय प्रलंबित असताना शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानाबरोबरच त्यांनी बांद्रा येथील एमएमआरडीए मैदानासाठी अर्ज केला होता व तेथे त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान परंपरेप्रमाणे आम्हाला द्यावे असा शिवसेनेचा आग्रह आहे. शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयाला धडक देऊन, आमच्या अर्जाचे काय झाले ? याबाबत विचारणा केली. विधी खात्यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने परवानगी देत येत नसल्याचे तेथील अधिका-यांनी सांगितले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे. त्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. वेदांत आणि फॉक्सकॉनसारख्या मल्टी नॅशनल कंपन्या राज्याबाहेर गुजरातला गेल्या. त्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्न अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. अशा सर्व राजकीय प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular