26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriबुरंबी-देवशेत रस्त्याची चाळण, ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

बुरंबी-देवशेत रस्त्याची चाळण, ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन ४ वर्षे उलटून गेली तरीही त्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

संगमेश्वर तालुक्यातील देवशेत-वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन ४ वर्षे उलटून गेली तरीही त्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. येथील सुरुवातीचा ४ किलोमीटरचा हा रस्ता जिल्हा परिषदेकडे तर उर्वरित ८ किमीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. बुरंबी- देवशेत या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे समजल्यानंतर या मार्गावरील स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागांकडे चौकशी केली; परंतु संबंधित विभागाने काम मंजूर असल्याचे सांगितले; काम सुरू कधी होणार या विषयी या विभागाकडून उत्तर मिळाले नाही. या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, मुंबई निवासी पंकज सप्तिस्कर यांनी थेट पंतप्रधान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांना निवेदने दिली.

या कामाचा पाठपुरावाही केला. कुठूनही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने परिसरातील ग्रामस्थानी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे पंकज सप्तिस्कर यांनी सांगितले. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात विभागला गेला आहे. सार्वजनिक बांधकामकडे असलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे जेणेकरून त्यापुढील काम मंजूर करणे सुलभ होईल, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला बुरंबी येथील प्रवेशद्वार आणि रत्नागिरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणानंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी – संगमेश्वर तालुक्यातील देवशेत- वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. यावरून धड चालताही येणे अशक्य झाले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन तब्बल ४ वर्षे उलटून गेली आहेत. येथील सुरुवातीचा ४ किलोमीटरचा हा रस्ता जिल्हा परिषदेकडे तर उर्वरित ८ किमीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तरीही त्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबद्दल ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. योग्य तीन कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular