27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

वैद्यकीय महाविद्यालयामुळे ३ वर्षांत रुग्णसेवेत चौपट वाढ : उदय सामंत

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा...

चिपळूण बसस्थानकाच्या कामाला नवी गती…

सहा-सात वर्षांपासून रखडलेल्या मध्यवर्ती एसटी बसस्थानकाच्या कामाला...

करूळ घाट दुरुस्ती, त्या’ सहा दरडी पाडण्यास सुरुवात

करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली असून,...
HomeSindhudurgतरूणीचे आंघोळ करताना चित्रीकरण करणाऱ्या, विकृत तरुणा विरोधात गुन्हा दाखल

तरूणीचे आंघोळ करताना चित्रीकरण करणाऱ्या, विकृत तरुणा विरोधात गुन्हा दाखल

पिडीत तरूणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेतील मोबाईलमध्ये चित्रीकरण होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

सिंधुदुर्गातील व सध्या नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्यास असणारी तरुणी मुंबईहून आपल्या मामाच्या गावी राहण्यास आली होती. यावेळी गावातील एका तरुणाने त्या तरूणींचे आंघोळ करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्या प्रकरणी विकृत अल्पवयीन तरूणा विरोधात राजापूर पोलिसांनी भादंवि कलम ३५४ सी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्ग तालुक्यातील आंगले शिंदेवाडी येथे हा प्रकार काल घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरूणी आपल्या कुटुंबासह आंगले, शिंदेवाडी येथील मामाच्या घरी उन्हाळी सुट्टी साठी आली होती. मामाचे घर साधे असून बाथरूमही कमी उंचीचे आहे. गुरुवारी सकाळी पिडीत तरूणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेतील मोबाईलमध्ये चित्रीकरण होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. ते दिसताच तिने ताबडतोब आरडा ओरड करायला सुरुवात केली.

कुटुंबियांनी तात्काळ तिच्या आवाजाकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी पिडीतेच्या मामाच्या घराच्या बाथरूमला लागून असलेल्या घरात जाऊन पाहिले असता सदरच्या घरात कोणी राहत नसताना त्या घरात एक तरूण लपून बसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या तरूणाचा मोबाईल तपासला असता मोबाईलच्या रिसायकल बिनमध्ये पिडीत तरूणीचे आंघोळ करताना शुटींग केलेले दोन व्हीडीओ आढळून आले.

पिडीतेने आरडा ओरड केल्यानंतर त्या तरूणाने व्हीडीओ डिलीट केल्याचे या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पिडीत तरूणीने राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर मौळे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular