25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeChiplunचिपळूण मधील स्वच्छ भारत अभियान व्यर्थ, कचऱ्याच्या प्रदूषणात वाढ

चिपळूण मधील स्वच्छ भारत अभियान व्यर्थ, कचऱ्याच्या प्रदूषणात वाढ

काही बेशिस्त नागरिकांनी चिपळूण शहराला कचरा डेपो करून सोडले आहे.

मागील वर्षी चिपळूण शहरात आलेल्या महापुरानंतर शहरामध्ये प्लास्टिकसह अन्य कचऱ्याचे व्यवस्थापन  विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नगर पालिकेमार्फत स्वच्छ व सुंदर शहर व्हावे, नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, रोगराई पसरू नये, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. याबरोबरच ‘स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान’ राबवले जात आहे. याशिवाय यापुढे ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रमा अंतर्गत नदीतील गाळ आणि स्वच्छ ठेवण्याबाबत अभियान राबवण्यात येणार आहे.

काही सामाजिक संस्थाही त्यासाठी हातभार लावत आहेत. शहरातील घरोघरी साठणारा कचरा संकलन करण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी घंटागाडीही फिरते. प्रशासनाने शहरातील विविध भागात येथे कचरा टाकू नये, असे ठळक अक्षरात फलकही लावले असताना देखील काही बेशिस्त नागरिकांनी चिपळूण शहराला कचरा डेपो करून सोडले आहे.

नगर परिषदेमार्फत शहरातील प्रत्येक प्रभागात दरदिवशी कचरा संकलन करणारी घंटागाडी फिरते तरीही काहीजण आपल्या घरातील कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून तो मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, नद्या, नाले, गटारात, मोकळ्या जागेत, इमारतीच्या आवाराबाहेर खुलेआम फेकत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर अनेकजण कचरा रस्त्याशेजारी टाकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियान राबवून त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या संदर्भात सोशल मीडियातूनही प्रचंड संताप व्यक्त होत असून संबंधिताना सुज्ञ व जागरूक नागरिकांनी तातडीने कठोर शासनाची मागणी केली आहे.

अनेकजण आपल्या घरातील टाकाऊ खाद्यपदार्थ पिशवीत भरून इमारतींच्या बाहेर भिरकावून देतात. आणि त्या पिशव्या कुत्री, गुरे तसेच गाढवं फाडतात आणि त्या इतरत्र पसरवतात. अनेकवेळा हा कचरा रस्त्यांवर अस्ताव्यस्त अवस्थेत पाहायला मिळतो. अशा घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते तर डासांचे प्रमाणही वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular