22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeSindhudurgकामावरून परतत असताना, रेल्वेच्या धडकेने तरुण जागीच गतप्राण

कामावरून परतत असताना, रेल्वेच्या धडकेने तरुण जागीच गतप्राण

रेल्वे ट्रॅकवर रात्री पाहणी करत असताना ट्रॅकमेन विनोद चव्हाण यांना सोनुर्ली रेल्वे ट्रॅकवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

हल्ली रेल्वेच्या धडकेमुळे अनेक जनावरे त्याप्रमाणेच मनुष्य देखील दगावल्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा गाड्या येण्या जाण्याच्या वेळेला गुरे वाटेवर बसलेली असतात. त्याचप्रमाणे काही वेळेला लोक सुद्धा ट्रेन येताना दिसत असून सुद्धा क्रॉस करण्याची घाई गडबड करतात आणि अशा प्रकारचे अपघात घडून जीवाला मुकतात.

सोनुर्ली येथील तरुणाचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सिद्धेश सगुण गावकर वय २८ असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.३) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सोनुर्ली-साखरमैना परिसरात घडली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी आज मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की रेल्वे ट्रॅकवर रात्री पाहणी करत असताना ट्रॅकमेन विनोद चव्हाण यांना सोनुर्ली रेल्वे ट्रॅकवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली, महेश जाधव, संभाजी देसाई आदींनी घटनास्थळी जात पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सिध्देशला रेल्वेची धडक बसली असावी, त्यात तो जागीच गतप्राण झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

पोलिसांना तो मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात नेला. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पोलिस उपनिरीक्षक तेली यांनी दिली. खबर बेनीत फर्नांडिस यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत सिद्धेश हा आपले काम आटोपून घरी जात होता. तो वेल्डिंगचे काम करत होता आणि शेती करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular