26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedमराठी बोला अन्यथा मनसेचा दांडा खेडमध्ये वैभव खेडेकरांचा इशारा

मराठी बोला अन्यथा मनसेचा दांडा खेडमध्ये वैभव खेडेकरांचा इशारा

बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत निवेदन देण्यात आले.

मराठी भाषाचा वापर बँक आस्थापनेत झालाच पाहिजे, यासाठी खेडमध्ये मनसे आक्रमक झाली आहे. खेडमध्ये विविध बँकांमध्ये वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील मनसे मनसैनिकांनी लाकडी दांडा भेट देत इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध आस्थापनेमध्ये मराठी भाषेचा वापर होताना दिसत नाही. खेडमधील विविध बँकामध्ये देखील असेच चित्र आहे याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक (आस्थापनांमध्ये) सर्व कर्मचारी यांनी मराठी बोलता आलेच पाहिजे, बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी विविध बँक आस्थापनेत जाऊन निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आला. आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाचं पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढ़ीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्या भाषणात ‘महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार, अन्य भाषा चालणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे असे सक्त आदेश काढले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेडमधील सर्व बँक आस्थापनेत जाऊन लाकडी दांडा भेट देत निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular