31.3 C
Ratnagiri
Thursday, November 7, 2024

सावंतवाडीत बंडखोरीचा इतिहास काय सांगतो?

येथील विधानसभा मतदारसंघात बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे....

उत्पादन शुल्ककडून कोटीचा मुद्देमाल जप्त – अवैध मद्याविरोध

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या...

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...
HomeRatnagiriरत्नागिरीत पोलिसांच्या सलामीने श्री देव भैरीची रंगपंचमी

रत्नागिरीत पोलिसांच्या सलामीने श्री देव भैरीची रंगपंचमी

धूपारत व गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची उत्सवाची सांगता झाली.

कोकणातल्या वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवाची शनिवारी रंगपंचमीने सांगता झाली. रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीला दुपारी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली आणि देव भैरी आपली पत्नी श्री देवी जुगाईच्या भेटीला निघाला. पुढच्या वर्षी परतभेटीला येतो, असे सांगून समजूत काढून श्री देव भैरीची पालखी रंगपंचमी खेळायला निघाली. ढोल- ताशांचा गजर, रंगांची उधळण करत भाविकांनी रंगपंचमीचा मनमुरादपणे आनंद घेतला. श्री देव भैरी आपल्या झाडगावातील मंदिरात पोहोचला आणि गाऱ्हाणे होऊन अपूर्व उत्साहात रात्री उशिरा उत्सवाची शांततेत सांगता झाली..

फाल्गुन पौर्णिमेला आपल्या राजवाड्यातून अर्थात मंदिरातून बाहेर पडून ग्रामप्रदक्षिणेला निघालेल्या रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव कोकणात वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज दुपारी पोलिसांची मानवंदना घेऊन श्री देव भैरी आई जुगाई देवीच्या मंदिरात पोहोचले. तिथे गाऱ्हाणे होऊन पुन्हा भेटीला येऊ, असे सांगत पालखी रंग खेळण्यास निघाली. अपार उत्साहात शिमगोत्सव साजरा होत असताना पंचमीच्या दिवशी सारेजण भावुक झाले. जुगाई मंदिरातून ठरलेल्या मार्गावरून पालखी निघाली. पालखीसोबत शेकडो भाविक, आबालवृद्ध सहभागी झाले.

झाडगाव नाका, गाडीतळ येथून पालखी पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात पोहोचली. तेथून शहर पोलिस ठाण्यात पोहचली आणि पोलिसांनी मैरीची पूजा करून रत्नागिरीचे रक्षण करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर श्री देव भैरीची पालखी धनजीनाका, राधाकृष्ण नाका, रामनाकामार्गे राममंदिरात पोहोचली. तेथून पुढे मारुती आळी, गोखलेनाका, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भुवनमार्गे मुरलीधर मंदिर येथे पोहोचली नंतर खालची आळीमार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री उशिरा पोहोचली. त्यानंतर गाऱ्हाणे होऊन श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न झाला. धूपारत व गाऱ्हाणे होऊन शिमगोत्सवाची उत्सवाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

Most Popular