25.1 C
Ratnagiri
Sunday, March 1, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeKhedखेडमध्ये कुडोशीत एसटी बसचा अपघात

खेडमध्ये कुडोशीत एसटी बसचा अपघात

ब्रेक लावला असता गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली.

खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी येथे रस्त्यावर आलेल्या गायींना वाचवण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एसटी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. खेड आगरातून दुपारी ३ वा. सुटणारी खेड वडगाव गाडी (एमएच-२०-बीएल-०४६१) घेऊन चालक बी. एम. घुगे आणि वाहक बी. एस. सोनकांबळे घेऊन निघाले. गाडी भरणे येथील सहा विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना कुडोशी येथे रस्त्यावर आडव्या आलेल्या गायींना वाचवण्यासाठी चालक घुगे यांनी ब्रेक लावला असता गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली.

नेहमी गर्दीने भरून जाणाऱ्या वडगाव गाडीच्या आगोदरच आज नांदिवली एसटी बस सुटल्यामुळे या गाडीला प्रवाशांची संख्या तुरळक होती. यामुळे अनर्थ टळला. या अपघातात साक्षी भागुराम तांबे (१७, रा. किंजळे), दिक्षा गांजेकर (१७. रा. कांदोशी) या दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांना येथील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular