27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedएसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी सवलतीचे स्मार्ट कार्ड म्हणून विविध गटातील प्रवासासाठी सुरू केलेली स्मार्ट कार्ड योजना गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. याबाबतची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे, ती कधी सुरू होणार याची महामंडळातील अधिकाऱ्यांकडे ठोस . अशी माहिती नाही. ते एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्ड योजनेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.एप्रिल-मे २०२२ ला एसटी महामंडळाने आदेश काढून एसटीत सवलतीत प्रवास करायचा असेल तर एक महिन्याच्या आत स्मार्ट कार्ड तयार करावे लागेल, या कार्ड शिवाय प्रवासात सवलत दिली नाही आणि ज्यांच्याकडे एसटीचे स्मार्ट कार्ड नसेल त्यांच्याकडचा दुसरा कोणताही पुरावा (ओळखपत्र) प्रवास भाड्यातील सवलतीसाठी ग्राह्य धरणार नसल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर, प्रारंभी स्मार्ट कार्ड तयार करून घेण्यासाठी जुनमध्ये अंतिम मुदत ठरवून देण्यात आली होती. अर्थात् अंतिम मुदत देण्यात आली असली तरी स्मार्ट कार्ड तयार करून देणे, त्याचे नुतनीकरण करणे ही प्रक्रिया बंद आहे. एवढेच नव्हे तर यासाठी जी यंत्रणा उभी केली होती ती यंत्रणा गोळा करून नेण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळ स्मार्ट कार्डची योजना गुंडाळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला जोर मिळत आहे. ग एसटी महामंडळ बस भाड्याच्या न संबंधी विविध सवलती देते. स्वातंत्र्य 7 संग्राम सैनिक, त्यांच्या विधवा, ज्येष्ठ न नागरिक, राज्य राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा गाजवणारे खेळाडू, दिव्यांग शासनाने सन्मान देऊन गौरविलेले

समाजसेवी आणि अधिस्विकृती धारक पत्रकार आदींचा सवलतीसाठी पात्र ठरलेल्यांमध्ये समावेश आहे. मात्र, प्रवासाची सवलत घेणारांसाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा (यापैकी एक) एसटीच्या वाहकाला दाखविणे आवश्यक होते. तीन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने या सर्व पुराव्यांना बाजुला करत स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. त्यानुसार,एसटीच्या प्रवासाची सवलत प्राप्त करण्यासाठी अथवा सुरू ठेवण्यासाठी स्मार्ट कार्ड तयार करून देण्यात येऊ लागले. जिल्हा, तालुका पातळीवर वेगवेगळ्या आगारात स्मार्ट कार्डसाठी अर्ज करायचा आणि ते कार्ड मिळवून घ्यायचे, अशी ही योजना होती. त्यानुसार, राज्यभरातील लाखो अर्ज आले अन् ते तयार करूनही घेतले. विशिष्ट कालावधीनुसार, या काहीचे नुतनीकरण करणेही बंधनकारक होते.

तांत्रिक अडचण कोणती हेच समजत नसल्याने यावर अद्याप उपाय मिळालेला नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून तांत्रिक अडचण सांगून कार्ड तयार करणे बंद असल्याचा बोर्ड या ठिकाणी टांगला गेला. नवीन कार्ड मिळणार नाही, फक्त जुन्या कार्डचे नुतणीकरण करून दिले जाईल, असेही सांगू लागले. आता तेही काम बंद पडले आहे. या संबंधाने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नाही.एका खाजगी कंपनीला स्मार्ट कार्ड बनविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. तांत्रिक अडचणीमुळे कार्ड बनविण्याचे थांबले आहे. असे अधिकारी सांगतात. मात्र ही तांत्रिक अडचण कोणती, तसेच त्याला पर्याय काय ? त्याचे उत्तर या अधिकाऱ्यांकडे नाही. अनेक स्मार्ट कार्डची मुदत ३१ मार्चला संपते त्यामुळे पुढे काय हा प्रश्न प्रवाशांच्यात उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular