27.1 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeChiplunपरशुराम घाटातील खचलेले काँक्रिटीकरण तोडण्यास प्रारंभ

परशुराम घाटातील खचलेले काँक्रिटीकरण तोडण्यास प्रारंभ

त्या ठिकाणी लवकरच नव्याने काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता; परंतु दुसऱ्या लेनवरील खडक तोडण्यासाठी बरेच दिवस गेल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले होते; मात्र खचलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एकीकडे दरडीची भीती तर दुसरीकडे खचलेल्या रस्त्याचा धोका निर्माण झाला होता. आता खचलेले काँक्रिटीकरण ब्रेकरने तोडले जात आहे. त्या ठिकाणी लवकरच नव्याने काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे; मात्र मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा वाढल्याने या ठिकाणच्या कामातील गुंता वाढत गेला.

परिणामी, परशुराम घाटातील काम अनेक महिने स्थगित ठेवण्यात आले होते. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता. या घाटातील अतिशय अवघड काम चिपळूण विभागाकडे न येता ते महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येते. कल्याण टोलवेज कंपनीमार्फत हे काम केले जात आहे; मात्र या कंपनीमार्फत दरडीच्या बाजूने केलेले काँक्रिटीकरण पहिल्याच पावसात खचले होते. गतवर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती; मात्र मोठ्या वळणावर रस्ता खचला असून, तेथून जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular