25.1 C
Ratnagiri
Sunday, September 8, 2024

19 वर्षीय फलंदाजाने रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रम

दुलीप करंडक स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली...

या दिवशी रिलीज होणार ‘पंचायत’चा तामिळ रिमेक…

'पंचायत' ही हिंदीतील सर्वात प्रसिद्ध आणि हिट...
HomeKhedएसटी कर्मचाऱ्यांचे सणासुदीच्या हंगामात १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांचे सणासुदीच्या हंगामात १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण

मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही.

एसटी महामंडळाचे कर्मचारी सणासुदीच्या दिवसात पुन्हा एकदा आंदोलनात उतरणार असून एसटी कामगार संघटनेने त्यांच्या २९ प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी १३ सप्टें पासून राज्यभर बेमुदत उपोषण पुकारले आहे. परिणामी, ‘लालपरी’ची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिस्तभंगाचे आदेश या उपोषणाच्या पार्भूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना दिले आहेत. २०२१ च्या ऐन दिवाळीच्या सणानंतर विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते.

यावेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्याने, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही, असा एसटी कर्मचारी संघटनेचा दावा आहे. त्यामुळेच मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी १३ सप्टें. पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. आझाद मैदानावर उपोषण तत्पूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी बोलावले नाही, तर १३ पासून राज्यभरात एसटी कामगार संघटनेतर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular